आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tjori Is An Online Store Which Deliver Indian Handicraft Products To North America

भारतीयांना विदेशात व्‍यवसायाची संधी, मानसी गुप्‍ताने सुरू केली वेबसाइट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तजोरी - "तजोरी" हा एक ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म आहे. या प्‍लॅटफाॅर्मला जम्‍मू येथ्‍ाील रहिवासी मानसी गुप्‍ता हिने 2013 मध्‍ये सुरू केला आहे. या माध्‍यमातून भारतीय हस्‍तकलाकार, दस्‍तकार आपले साहित्‍य विदेशात विक्री करू शकतात. या प्‍लॅटफॉर्मने दस्‍तकारांसाठी उत्‍तर अमेरीकेत मोठे मार्केट उभारण्यात आले आहे. पर्यटकांकांना आकर्षित करण्‍यासाठी तसेच भारतीय लोकांना आपल्‍या परिश्रमाचा योग्‍य मोबदला मिळावा, या उद्देशाने ही वेबसाईट सुरु केल्याचे मानसी गुप्‍ता हिने सांगितले.
खरेदीमुळेच आवड निर्माण झाली
मानसीचा जन्‍म जम्‍मुत झाला. पर्यटनस्‍थळी फिरणे, तेथील हस्‍तशिल्‍प खरेदी करण्‍याची तिला खुप आवड आहे. या आवडीमुळेच भारतीय हस्‍तकलाकरांचे साहित्य परराष्‍ट्रात विक्री करता यावे, या विचारातून वेबसाइट सुरु केल्याचे मानसीने सांगितले. मानसीचा माध्यमिक शिक्षण जम्‍मुत नागबनी आणि महाराजा हरिसिंह शाळेत झाले. उच्चशिक्षणासाठी ती पुण्‍यात आली, पुणे विद्यापीठात तिने BCA पूर्ण केल. नंतर युकेमधील वेल्‍स विद्यापीठातून उच्‍चपदवी प्राप्त करून ती मायदेशात परतली. आयबीएममध्‍ये नोकरी करत आपल्‍या करिअरची सुरुवात केली.
अशी आली 'तजोरी' सुरू करण्‍याची कल्‍पना
मानसी गुप्‍ता एकदा कामानिमित्‍त वाॅर्टनला गेली होती. तिथे तिने एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. वॉर्टनमधून तिने काही हस्‍तकलेच्‍या वस्‍तु खरेदी केल्‍या. परंतु त्‍या वस्‍तु विमानातुन आणताना तिला खूप अडचणी आल्या. अशा वस्तु खरेदीचा त्रास कमी करण्‍यासाठी काय करता येईल? असा प्रश्न तिच्या मनात सारखा घर करत होता. त्यातून 'तजोरी'ची कल्पना सुचल्याचे मानसीने सांगितले.
भारतीय बाजारपेठेचा अभ्‍यास केला
वार्टनमध्‍ये राहात असताना मानसी गुप्‍ताने भारतीय हस्‍तशिल्‍प बाजारपेठेविषयी संशोधन केले. बाजारात भारतीय हस्‍तशिल्‍पचा वाटा 32 अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचे तिला या संशोधनातून माहिती मिळाली. या व्‍यवसायात प्रवेश करण्‍याचा निर्धार तिने पक्का केला. उत्‍तर अमेरिकेत शिल्‍पकलांसाठी मोठी बाजारपेठ आहे. परंतु दलालांमुळे उपभोक्त्यांच्या हातात वस्‍तु पोहोचण्यापर्यंत ती खुप महाग होत जाते. यामुळेच या व्‍यवसायात पडण्‍याचा ठरवल्‍याचे मानसी सांगते.
'तजोरी 'शिल्‍पकारांसाठी फायदेशिर आहे
भारतीय शिल्‍पकार, दस्‍तकारांचे साहित्‍य याेग्‍य किंमतीत व सहजरित्‍या परराष्ट्रात पाठवता यावे, हा 'तजोरी' वेबसाइटचा मूळ उद्देश आहे. शिल्‍पकारांना साहित्‍याचा योग्‍य मोबदला मिळावा याचा विचार करून वेबसाइटच नाव 'तजोरी' ठेवण्‍यात आले आहे.

पहिल्‍याच दिवशी क्रॅश झाली वेबसाइट
वेबसाइट सुरु केल्यानंतर पहिल्‍याच दिवशी ती क्रॅश झाली होती. कंपनीला काही दिवस आपले काम बंद ठेवावे लागले होते. या काळात मानसीजवळ तजोरीच्‍या माध्यमातून 250 ऑडर्स आल्‍या होत्‍या, याआधी तजोरी फक्‍त उत्‍तर अमेरिकेत सेवा देत होती. ता भारतातही सेवा देत आहे.
स्‍वत: सांभाळते व्‍यवसाय
'तजोरी'चा सर्व व्याप मानसी स्‍वत: सांभाळते, वस्‍तु ऑडर करणे, पाठवणे, याशिवाय व्‍यवस्‍थापणाची सर्व कामे ती स्‍वत: करते. मानसीला संपूर्ण भारतात आपल्या कामाचा विस्तार करायचा आहे. परंतु, हे काम ख्‍ाुप अवघड होते. कारण, त्‍यासाठी शिल्‍पकारांना विश्वासात घ्‍यावे लागणार होते. मानसी आता टीमच्‍या सदस्‍यांना व दस्‍तकारांना बदलण्‍याचे काम करत आहे.