आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षांचे झाले पिचाई; शाळेत कधी चौथा नंबरही मिळाला नाही, जीमेल माहित नव्हते, आता गूगल CEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव: पिचाई सुंदर राजन
जन्म: १२ जुलै १९७२ (वय ४५)  
ठिकाण : तामिळनाडूच्या मदुराईत
शिक्षण : खरगपूर आयआयटीतूून बी.टेक., स्टॅनफोर्डमधून  एम.एस तसेच पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून एमबीए.
 
सुंदर पिचाई यांनी बुधवारी वयाची ४५ वर्षे पूर्ण केली. गुगल या जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन कंपनीचे सीईओ सुंदर यांचा जन्म १२ जुलै १९७२ रोजी तामिळनाडूच्या मदुराईत झाला. शालेय शिक्षण चेन्नईत तर आयआयटी खरगपूरमधून बी.टेक. पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. पण अमेरिकेत जाण्यासाठी विमान तिकिटासाठी त्यांना वडिलांचा वर्षभराचा पगार खर्च करावा लागला. शालेय शिक्षणात त्यांनी कधीच चौथ्यापेक्षा वरचा क्रमांक मिळवला नाही. भूगोल व इतिहासात कमी गुण; पण विज्ञानात अव्वल असायचे. लहानसे घर, कमी पैशात उदरनिर्वाह करणे पण क्षमतेच्या बळावर मोठी स्वप्ने  सत्यात उतरवणाऱ्या मध्यमवर्गीय भारतीयांसारखीच सुंदर यांचीही जीवनगाथा आहे. ते अमेरिकेत सर्वाधिक पगार असलेले सीईओ असून रोजचे उत्पन्न ३.५२ कोटी आहे.  
 
सुंदर विचार: अपयशाचाही सन्मानाने स्वीकार करा
स्वत:त असुरक्षिततेचा भाव येऊ द्या, हा तुमच्या प्रगतीसाठी मदतीचा ठरेल  
असुरक्षितता ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापेक्षा उत्तम लोकांत वावरताना आपल्यावर अधिक उत्तम काम करण्याचा दबाव आहे, असा याचा अर्थ होतो. स्वत:त असुरक्षिततेचा भाव येऊ द्या. त्याची वैयक्तिक विकासात मदत होते.   
 
आपल्याला जे आवडते तेच केले तर आपण जे शिकलो त्याच्याशी ती बेइमानी ठरेल  
आपल्या अपयशाचाही सन्मान करा. ते यशापेक्षा मोठे भांडवल आहे. आपल्या मनाचे ऐकून आवडीनुसार काम कराल तर ते नेहमीच उत्तम ठरेल. यात तुम्ही किती आणि काय शिकलात यामुळे काहीच फरक पडत नाही.  
 
लीडरने आपल्या यशावर लक्ष देऊ नये, इतरांचे यश अधिक महत्त्वाचे असते  
आयुष्यात सर्वकाही ठीक असून आनंदी नसलेला नव्हे तर प्रत्येक गोष्टीबाबत दृष्टिकोन योग्य असल्याने आनंदी असणाराच योग्य असतो. लीडर या नात्याने आपल्या यशावरच लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे नसून इतरांचे यशही अधिक गरजेचे असते.  
 
अमेरिकेतील तिसऱ्या महागड्या सीईओचे पॅकेज ६८६ कोटी  
पिचाई हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे सीईओ आहेत. ब्ल्यूम्बर्गनुसार, २०१६ मध्ये त्यांना ६८६ कोटींचे पॅकेज होते. २०१५ मध्ये त्यांना वेतन व अन्य भत्त्यांच्या रूपात १२८५ कोटी रुपये मिळाले होते. त्या वर्षी अमेरिकेतील एखाद्या सीईओला देण्यात आलेली ती सर्वाधिक रक्कम होती. २०१६ मध्ये त्यांना वेतनाच्या रूपात ४१७ कोटी रुपये मिळाले. २०१५ च्या तुलनेत ही रक्कम थोडी कमी आहे.
 
सुंदर यांची वैशिष्ट्ये  
यासाठी ते ओळखले जातात 
- २००४ मध्ये ते गुगलमध्ये रुजू झाले. ११ वर्षांनंतर २०१५ मध्ये गुगलचे सीईओ बनले. तत्पूर्वी ट्विटरने त्यांना उपाध्यक्षपदाचा तर मायक्रोसॉफ्टने सीईओपदाचा प्रस्ताव दिला होता. 
- त्यांनी क्रोम वेब ब्राऊझर व वेबआधारित क्रोम ओएस सादर केली. २०१२ मध्ये गुगल अॅप्सची व वर्षभरातच अँड्राॅइडचीही जबाबदारी स्वीकारली. जीमेल, गुगल मॅप अॅप्स बनवले. गुगलच्या सर्व उत्पादनांसाठी अँड्रॉइड अॅप तयार केले.  
 
यातून त्यांचे कर्तृत्व सिद्ध होते  
- सुंदर यांची गुगल ब्राऊझर बनवण्याची कल्पना गुगलचे सीईओ अॅरिक श्मिट यांनी  फेटाळली. नंतर ते संस्थापक लॅरी पेज व सर्गेई ब्रीन यांच्याकडे गेले आणि त्यांना यासाठी राजी करवून घेतले. २००८ मध्ये गुगलने क्रोम ब्राऊझर आणले. सध्या ५०% मार्केट शेअर याचेच असून जगभरात सर्वाधिक याचाच वापर होतो.  
 
तीन ‘सुंदर’ कथा  
वयाच्या १२ व्या वर्षी चार महिन्यांपूर्वी ऐकलेला दूरध्वनी क्रमांकही सहज सांगून द्यायचे  
सुंदर यांचे काका एस. रमन यांनी सांगितले की, ‘सुंदर बालपणापासूनच कुशाग्र आहे. तो १२ वर्षांचा होता तेव्हा माझे एक मित्र घरी आले होते. त्यांनी त्यांचा दूरध्वनी क्रमांक सांगितला तो मी पत्नीला लिहून घेण्यास सांगितला. चार-पाच महिन्यांनंतर मी पत्नीला तो क्रमांक मागितला, पण तिने तो क्रमांक लिहिण्याचे राहून गेल्याचे सांगितले. पण सुंदरने तो क्रमांक सांगितला.’ गुगलच्या अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष अॅलन युस्टास यांनीही एक आठवण सांगितली. ‘एका बैठकीवेळी बॉयस अॅक्टिव्हेटेड सर्चची माझी आकडेवारी सुंदर यांनी सादर केली.  सुंदर यांनी सांगितलेले अनेक आकडे मलाही माहीत नव्हते.’  
 
पुढील स्लाइडवर वाचा,
> गुगल सोडणार होते पण ‘लकी चार्म’ पत्नी अंजली यांनी दिला न सोडण्याचा सल्ला  
> वडिलांसाठी प्रशस्त फ्लॅट घेतला, पण आई-वडिलांनी राहण्यासाठी फक्त दोन खोल्यांचेच घर निवडले
 
पुढील स्‍लाइडवर पाहा व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...