आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पाच आलिशान आणि महागड्या यॉट, हेलिपॅडसह अनेक लक्झरी सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगामध्ये लोकांना अनेक छंद आणि आवडी आहेत. ते पूर्ण करण्यासाठी लोक कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतात. असाच एक श्रीमंती शौक म्हणजे, स्वतःच्या मालकीची एखादी यॉट असणे. यॉट खरेदी करणे हे काही सर्वसामान्यांचे काम नाही, हे वरील छायाचित्र पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल. धनकुबेरांचा हा छंद असून यॉटवर लक्झरी सुविधा असणे हे तुमच्या श्रीमंतीला 'चारचांद' लावण्यासारखे आहे. लक्झरी यॉट म्हणजे एखाद्या चालत्या-फिरत्या आलिशान हॉटेलपेक्षा कमी नसतात. यॉटवर हेलिपॅड देखील असतो, यावरुन येथे काय-काय सुविधा असतात याचा अंदाज येईल. या पॅकेजमध्ये आम्ही जगभरताली पाच सर्वात सुंदर आणि महागड्या यॉटची वाचकांना माहिती करुन देत आहोत.

का म्हणतात यॉट
डच नेव्हीने समुद्रात हलक्या आणि वेगवान धावणारी मोठी जहाजे तयार केली आणि त्यांना यॉट हे नाव दिले होते. मात्र हळुहळु मोठ्या औद्योगिक जहाजांनाही यॉट म्हटले जाऊ लागले. सध्या लक्झरी जहाजांना यॉट म्हणण्याची प्रथा आहे.
या आहेत जगातील शानदार यॉट

अजाम
युनायटेड अरब अमिरातीचे अध्यक्ष खलीफा अल नाहयान यांच्या मालकीच्या 'अजाम' यॉटची ख्याती जगभरात आहे. ही जगातील सर्वात मोठी यॉट असल्याचे मानले जाते. 5 एप्रिल 2013 रोजी लर्सन यॉट कंपनीकडून खलीफा यांनी यॉटची खरेदी केली होती. 590 फूटांच्या या यॉटच्या निर्मीतीला तीन वर्षे लागले असून 3812 कोटी रुपये खर्च आला होता. हिचा वेग ताशी 30 नॉटिकल मैल आहे.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, जगातील आलिशान आणि महागड्या यॉट बद्दल
बातम्या आणखी आहेत...