आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 थकबाकीदारांकडेच 1.21 लाख कोटी अडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारी बँकांच्या अडकलेल्या कर्जातील टॉप ५० डिफॉल्टर्सकडेच १.२१ लाख कोटी रुपये अडकलेले असल्याची माहिती अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. विलफुल डिफाॅल्टर्सची (मुद्दाम कर्ज थकवणारे कर्जदार) संख्यादेखील वाढली असून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ७६८६ विलफुल डिफाॅल्टर्सकडे सरकारी बँकांचे ६६,१९० कोटी रुपयांचे कर्ज अडकलेले आहे.

देशातील मोठ्या थकबाकीदारांकडे सरकारी क्षेत्रातील बँकांचे ६६,१९० कोटी रुपये अडकलेले आहेत. यात सर्वात जास्त थकबाकी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची आहे. थकबाकीदारांनी एसबीआयचे ११,७०० कोटी रुपये अडकवलेले आहे, तर एसबीआयच्या सहकारी बँकांचे १८,७०० कोटी रुपये अडकलेले आहेत. राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली असली तरी भारतीय रिझर्व्ह बँकेेच्या नियमांनुसार थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. ही आकडेवारी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची आहे.

सहयोगबँकांचे कर्जही जास्त : थकबाकीदारांमध्येसर्वात जास्त थकबाकी ही एसबीआय बँकेची आहे. एसबीआयच्या विलफुल डिफॉल्टर्सकडे ११,७०० कोटी रुपये थकलेले आहेत, तर एसबीआय तसेच तिच्या सहकारी बँकांचे थकबाकीदारांकडे १८,७०० कोटी रुपये थकलेले आहेत.
कडककारवाई : मोठ्याथकबाकीदारांच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या वतीनेदेखील कडक इशारा देण्यात आला होता.

एफआयआर दाखल
जयंतसिन्हा यांनी सांगितल्याप्रमाणे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत १६६९ थकबाकीदारांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर बँकांची १८,२०० कोटी रुपये थकीत आहेत. काहींच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

पीएनबी दुसऱ्या क्रमांकावर
एसबीआयनंतरदुसऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेचे थकबाकीदारांकडे १०,९०० कोटी रुपये अडकलेे आहे. युको बँकेचे ४,२५० कोटी रुपये थकलेले आहेत. कॅनरा बँकेचे ३,२०० कोटी, युनियन बँक ३०७० कोटी, बँक ऑफ इंडियाचे २७०० कोटी थकलेे आहेत.
बातम्या आणखी आहेत...