आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन ड्रायव्हिंग लायसनवर जगातील या 10 देशांत चालवू शकतात वाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन (आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना) असेल तरच विदेशात वाहन चालवता येते, असा बहुतेकांचा समज असतो. मात्र, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, जगातील काही निवडक देशात रोडट्रिप फ्रेंडली आहे. अर्थात तुम्ही इंडियन ड्रायव्हिंग लायसनवर (भारतीय वाहन चालक परवाना) बिनधास्त वाहन चालवू शकतात. तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. मात्र, वाहन चालवताना संबंधित देशाचे वाहतुकीचे नियम व निर्देशकांचे काटेकोर पालन करावे लागते.

इंडियन ड्रायव्हिंग लायसनवर तुम्ही स्विर्त्झलंडच्या डोंगराईपासून तर न्यूझीलंडमधील शार्प टर्न्सवर देखील वाहन चालवू शकतात. मात्र, तुमचे लायसन्स इंग्रजीत असणे गरजेचे आहे.
या पॅकेजमधून आज आम्ही आपल्याला जगातील अशाच 10 देशांची माहिती घेऊन आलो आहे. या देशांमध्ये भारतीय पर्यटक ड्रायव्हिंग लायसनवर वाहन चालवू शकतो.

यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका (राइट साइड ड्रायव्हिंग)
तुम्ही भारतीय नागरिक आहेत. तुमच्याकडे भारतीय ड्रायव्हिंग लायसन आहे. विशेष म्हणजे ते इंग्रजीत आहे. तर मग तुम्हाला अमेरिकेतील रस्त्यांवर वाहन चालवताना कोणी रोखू शकत नाही. मात्र, यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. जसे की, भारतीय ड्रायव्हिंग लायसनवर अमेरिकेत केवळ एक वर्ष वाहन चालवता येते. मुदत संपल्यानंतर मात्र, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग बनवून घ्यावे लागते. याशिवाय आय-94 फॉर्म आपल्याजवळ ठेवावा लागत असतो. त्यावर अमे‍रिकेत प्रवेश करण्याची तारीख नमुद केलेली असावी.

पुढील स्लाइडवर वाचा, इंडियन ड्रायव्हिंग लायसनवर या देशातही चालवू शकतात वाहन...