आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळींची आयात वाढवणार, किमती कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डाळींचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या वतीने आणखी डाळ आयात करण्याचा विचार सुरू आहे. सध्या बाजारात तूरडाळ १८० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. सरकारच्या वतीने आयात करण्यात आलेल्या डाळी बाजारात उपलब्ध झाल्यामुळे डाळीचे भाव कमी झाले आहेत. डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारच्या वतीने आणखी निर्यात वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे.
सरकारच्या वतीने एमएमटीसीने आतापर्यंत ५००० टन तूरडाळ आयात केली आहे. ही डाळ दिल्लीसह काही राज्यांमध्ये पाठवण्यात आली आहे. त्या - त्या राज्यांमध्ये किरकोळ बाजारात या डाळी विक्री होणार आहेत. २०१४-१५ मध्ये कमजोर मान्सूनमुळे कडधान्य उत्पादनावर परिणाम झाला असून कडधान्याचे उत्पादन २० लाख टनाने घटले आहे. यामुळे बाजारातील डाळींच्या किमती वाढल्या होत्या. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत अर्थ, अन्नधान्य, कृषी आणि वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत निर्णय
केंद्रीय सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांची खाद्यपदार्थांच्या किमतीबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये डाळींच्या किमती आणखी कमी करण्यासाठी आयात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आयात करण्यात आलेल्या डाळींवर लक्ष ठेवण्याचा निर्णयदेखील या वेळी घेण्यात आला. आयात डाळी वितरणावरदेखील लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
उत्पादनावर परिणाम
रब्बी पिकांवर वातावरणाचा विपरीत परिणाम झाल्यामुळे कडधान्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काळात डाळींच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. यामुळे डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आणखी डाळ आयात करण्यावर विचार करत आहे.

दरवर्षी आयात
मान्सून कमजोर राहिल्यामुळे पीक वर्ष २०१४-१५ (जुलै - जून) दरम्यान देशातील कडधान्य उत्पादन २० लाख टनांनी घटले आहे. या वर्षी १.७२ कोटी टन डाळींचे उत्पादन झाले. देशात दरवर्षी २.५ कोटी टन डाळींची आवश्यकता असते. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी देशात जवळपास ४० लाख टन डाळींची आयात केली जाते. मात्र, या वर्षी सरकारने स्वत: डाळ आयात करणे सुरू केले आहे. आतापर्यंत ७४.०६ लाख हेक्टरवर पेरणी कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या रब्बीच्या हंगामात २०१५-१६ दरम्यान गेल्या आठवड्यापर्यंत कडधान्यांची पेरणी ७४.०६ लाख हेक्टरपर्यंत गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या ७७.४२ लाख हेक्टर पेरणीपेक्षा या वर्षीची आतापर्यंतची पेरणी कमी आहे.