आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio विदेशात विकत आहे यूजर्सचा Data, मिळवतेय पैसा; हॅकर्स ग्रुपचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- Reliance Jio ची अट्रॅक्टिव्ह ऑफर्स सध्या चांंगलीच चर्चेत असताना कंपनीवर घणाघाती आरोप करण्यात आला आहे. तो म्हणजे, कंपनी यूजर्सची माहिती विदेशात विकते. त्याद्वारे मोठा पैसा कमावत आहे. कंपनीने यूजरची माहिती US आणि सिंगापूरमधील टार्गेटेेड बिझनेस नेटवर्क्सला पाठल्याचे एका हॅकिंग ग्रृपने म्हटले आहे.

hacktivist ने किया है दावा...
- रिलायन्स Jio यूजर्सची माहिती विदेशात विकत असल्याचा दावा हॅकिंग ग्रुप hacktivist ने केला आहे. इतकचे नव्हे तर, लवकरच रिलायन्स जिओ कंपनी आणि सरकारी माहिती हॅक करणार असल्याचे आव्हान देखील Hacktivist ने केलेे आहे.
- ट्विटरवर हा हॅकिंग ग्रुप AnonIndia (@redteamin) या नावाने अॅक्टिव्ह आहे.
- टार्गेटेड अॅडव्हर्टाइझिंग यूजर्सला पाठता येईल, यासाठी रिलायन्स jio आपल्या यूजर्सची माहिती विदेशात पाठवत असल्याचा दावा हॅकिंग ग्रुपने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स यातून मोठा पैसाही कमावत आहे.

तुम्हीही पाहू शकता कोणती माहिती रिलायन्स करतेय शेअर....
- या ग्रुपने एक डिटेल्ड ब्लॉगमध्ये सांगितले आहे की, रिलायन्स कोणती माहिती विदेशातील कंपनीला शेअर करतो आहे हे यूजर्स तपासू शकतो.
- पण ही फारच गुंतागुंतीची तांत्रिक प्रक्रिया आहे. सामन्य व्यक्तिच्या समजण्याच्या पलिकडे आहे.
- तुम्हाला ही प्रक्रिया हाताळायची असल्यास 'टम्बलर' (Tumbler) वर ग्रुपची एक पोस्ट पाहू शकता.
- Jioची शेअरिंग टेक्निक कशी माहीत करून घ्यावी, या संदर्भात माहीती देण्यात आली आहे.

याआधीही झाला होता आरोप...
- रिलायन्स Jio वर याआधी यूजर्सचा डेटा विदेशात पाठवल्याचा आरोप झाला होता. RJio chat app द्वारा यूजर्सचा डेटा एका चीनी IP अॅड्रेसवर पाठवण्यात आल्याचा दावा एका हॅकिंग ग्रृपने केला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, Jio ने फेटाळला हॅकिंग ग्रुपचा आरोप....Jio कुठे पाठवते आहे यूजर्सचा डेटा?
बातम्या आणखी आहेत...