आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UCO Bank Opened This Branch In Maharashtra\'s Ahmadnagar District

भारतात या बॅंकेच्या शाखेला कधीच लागत नाही कुलुप, RBIला बदलावे लागले नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत सरकारने देशातील प्रत्येक बँकेच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण यंत्रणा उभारली आहे. बँकांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला जात नाही. परंतु, देशातील यूको बॅंकेचे एक शाखा अशी आहे की, तिला कधीही कुलुप लागत नाही. या बॅंकेला देशातील
पहिल्या लॉकलेस ब्रँचचा दर्जा देखील मिळाला आहे. युको बॅंकेच्या या शाखेसाठी भारत सरकार व भारतीय रिझर्व बँकेने आपल्या नियमावलीत बदल केला होता.

या पॅकेजमधून आम्ही वाचकांना महाराष्‍ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंकेच्या शाखेविषयी माहिती देत आहोत. युको बॅंकेच्या शाखेला दरवाजे, खिडक्या आहेत. परंतु, ते कधीच बंद होत नाहीत. त्यांना कुलुप लावले जात नाही.

युको बॅंकेने 2011 मध्ये शनि शिंगणापूर येथे आपली शाखा सुरु केली. यापूर्वी येथे एकाही बॅंकेने आपली शाखा उघडली नव्हती. कारण एकच की, येथे बॅंकेची शाखा सुरु करण्यासाठी तिला कुलुप लावले जाणार नाही, अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. मात्र, ही मागणी सरकार, स्थानिक पोलिस व आरबीआयने फेटाळून लावली होती. बॅंकेत जनतेचे रुपये असतात. जनतेच्या रुपयांचे रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे, अशी भूमिका भारत सरकारने घेतली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, युको बॅंकेने शनि शिंगणापूरमध्ये का सुरु केली लॉकलेस ब्रँच...