आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक सभा म्हणजे "टी किंवा समोसा पार्टी' नव्हे, सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कंपन्यांच्या वार्षिक सभा म्हणजे केवळ "टी किंवा समोसा पार्टी' नाही, तर त्यात कंपन्यांच्या भागधारकांनी नीतिगत मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, असे मत सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी व्यक्त केले. तामिळनाडू गुंतवणूकदार असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

गुंतवणूकदारांच्या सक्रिय सहभागामुळे ५०० कंपन्यांच्या सीईआेंना तीन वर्षांत राजीनामा द्यावा लागला होता. शेअरधारकांनी त्यांची नियुक्ती रद्द केली होती. यासंदर्भात सर्व गुंतवणूकदार असोसिएशनसोबत सेबी चर्चा करत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
वृत्त वाहिन्यांवर शेअरच्या भावाची जी पट्टी दाखवण्यात येते, त्यात शेअरची फेस वॅल्यू एक रुपया आहे की दोन रुपये हेदेखील दाखवणे आवश्यक आहे. याची माहिती नसल्याने लहान गुंतवणूकदारांची चुकीची धारणा होत असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. त्यासाठी अनेक नवीन निर्णय घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
बीएसई १००० कंपन्यांची लिस्टिंग संपवणार : चौहान
1. मुंबई शेअर बाजार (बीएसई) १००० पेक्षा जास्त कंपन्यांची शेअरमधील लिस्टिंग संपवणार आहे. शेअर बाजाराचे एमडी आणि सीईओ अाशिष कुमार चाैहान यांनी ही माहिती दिली. दुरुपयोग थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
2.बीएसईचा वापर चोरी किंवा सट्टा लावण्यासाठी करण्यात येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू. अनेक उद्योगांच्या संघटनांचा मात्र विरोध.
3.गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित केल्यास गुंतवणूक वाढेल, असे मत चौहान यांनी नोंदवले.
4.छोट्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात पैसे लावण्याचे सिन्हा यांचे आवाहन. गेल्या दोन दशकांत भारताचा जीडीपी अनेक पटींनी वाढला. तसेच मध्यम वर्गाची लोकसंख्यादेखील १० पट झाली. मात्र, गुंतवणूकदार कमीच.

सुरक्षेबाबत भारत टॉप १० मध्ये
व्यवसाय करण्यास सोपे असलेल्या जागतिक क्रमवारीत इतर देशांच्या तुलनेत भारताचा १४२ वा नंबर आहे. असे असले, तरी गुंतवणूकदरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जगात भारत टॉप १० मध्ये असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केलेे. या आधीचा विचार केला, तर वर्ष २०१२ मध्ये भारत ४९ व्या, तर २०१३ मध्ये ३४ व्या क्रमांकावर होता. मात्र, गेल्या वर्षात आपण सातव्या क्रमांकावर आल्याचे सिन्हा म्हणाले.