आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Finance Minister Arun Jaitley Reaches Out To Opposition On GST

\'जीएसटी\' म्हणजे काय रे भाऊ! हिवाळी अधिवेशनात तरी मंजुर होईल का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जीएसटी' हा शब्द गेली आठ-नऊ वर्षांपासून आपण सातत्याने ऐकतो आहे. जीएसटी अर्थात गुड्‍स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स (वस्तु व सेवा कर) विधेयक 6 मे 2015 रोजी लोकसभेत संमत झाले खरे. परंतु अजूनही देशात ते लागू झालेला नाही. जीएसटीचे भिजत घोंगडे पडले आहे. गुरुवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र, हे अधिवेशन देशात वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादळी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच जीएसटी सारख्या महत्त्वाचे विधेयक मंजुर करवून घेताना मोदी सरकारच्या तोंडाला फेस येणार आहे.

दरम्यान, जीएसटी लागू झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? सरकारची भूमिका काय? विरोधकांचा आडमुठेपणा? विदेशी गुंतवणुकीला चालना मिळून रोजगार कसे निर्माण होतील? तसेच उद्योजकांसह देशातील सामान्य जनतेला काय फायदा होईल? या पार्श्वभूमीवर 'जीएसटी'वर टाकलेला एक दृष्‍टीक्षेप...


कॉंग्रेसने आडमुठेपणाने जीएसटी विधेयक अडवून ठेवल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. मात्र, युपीए सरकारने जीएसटी लागू करण्‍यासाठी मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाले. मात्र, राज्यसभेत ते लटकले. खरेतर भाजपने सत्तेबाहेर असताना जीएसटीला विरोध केला होता. पण आता सत्तेवर आल्यानंतर मात्र भाजपने या विधेयकाचा आग्रह धरला आहे.

जीएसटीला मंजुरी मिळवण्यासाठी सरकारचा विरोधकांची मनधरणी करून त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी 32 पैकी 30 पक्षांनी समर्थन दिले असल्याचा दावा सरकारने केला आहे. हे विधेयक पुढील आठवड्यात राज्यसभेत सादर होऊ शकते.

केळकर समितीने 2003 मध्ये करसुधारणांचा भाग म्हणून जीएसटीची शिफारस केली होती. करसुधारणा विधेयक म्हणून युपीए सरकारने जीएसटी विधेयक तयार केले व ते लोकसभेत मांडले होते. 1947 नंत‍रचे सर्वात महत्त्वाचे करसुधारणा विधेयक म्हणून जीएसटीकडे पाहिले जात आहे. या विधेयकामुळे केंद्रीय अबकरी कर, राज्याचा मुल्यवर्धित कर (व्हॅट), करमणूक कर, जकात, चैनीच्या वस्तुवरील कर, खरेदी कर हे असणार नाहीत. त्याऐवजी एकच कर असेल. तो म्हणजे गुड्‍स अॅण्‍ड सर्व्हिस टॅक्स (वस्तू व सेवा कर) अर्थात जीएसटी.

पुढील स्लाइडवर वाचा,

@जीएसटी म्हणजे काय?
@जीएसटीमुळे सेवा महागण्याच्याची शक्यता..
@जीएसटी लागू झाल्यास वस्तू स्वस्त तर सेवा महागणार..
@जीएसटी आकारणीची पद्धत...
@जीएसटीचे नेमके फायदे काय?
@जीएसटीला होतोय अनेक राज्यांकडून विरोध
@काँग्रेस या मागण्यांवर अडून...