आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Government Launch New Portal For Searching Job

केंद्र सरकारच्या नवीन पाेर्टलने नाेकरीचा शाेध घेणे झाले साेपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सूक्ष्म, लघु अाणि मध्यम क्षेत्रात नाेकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने एक खास नवीन पाेर्टल सुरू केले अाहे. www.Eex.Dcmsme.Gov.In नाव असलेल्या या पाेर्टलच्या माध्यमातून या उद्याेगाला कुशल मनुष्यबळाचा शाेध घेता येणेही शक्य हाेणार अाहे. लवकरच सेवा क्षेत्रासाठीही असे संकेतस्थळ सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस अाहे.

डिजिटल इंडिया, स्किल इंडिया अाणि मेक इन इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे स्वप्न असून ते साकारण्यासाठी लघु अाणि मध्यम उद्याेगांसाठी हे ‘एम्प्लाॅयमेंट एक्स्चेंज ’ पाेर्टल सुरू करण्यात अाले अाहे. नाेकरीच्या शाेधात असलेल्या उमेदवारांना कंपन्या तसेच कंपन्यांना उमेदवाराचा शाेेध घेणे शक्य हाेऊ शकेल, असे सूक्ष्म, लघु अाणि मध्यम उद्याेगमंत्री कालराज मिश्र यांनी या पाेर्टलचे अनावरण करताना सांगितले.

या नवीन पाेर्टलवर अातापर्यंत दाेन जणांनी नाेंदणी केली असल्याचे सांगून िमश्र म्हणाले की, कुशल मनुष्यबळाचा शाेध घेण्यासाठी लागणारा वेळ अाणि खर्च या नवीन संकेतस्थळामुळे वाचू शकेल.

सेवा क्षेत्रासाठी पाेर्टल
एमएसएमई मंत्रालयाचे विशेष सचिव अमरेंद्र िसन्हा म्हणाले की, उद्याेग तसेच व्यावसायिकांना अाणखी सुलभ व्हावे यासाठी या संकेतस्थळामध्ये अाणखी काही वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार अाहे. सध्या हे पाेर्टल उत्पादन क्षेत्रापुरते मर्यादित असून उमेदवारांना काेणतेही शुल्क पडणार नाही. पण उद्याेगाला मात्र ते वापरण्यासाठी शुल्क भरावे लागेल. लवकरच सेवा क्षेत्रासाठीही अशाच प्रकारचे पाेर्टल सुरू करण्याचा मनाेदय त्यांनी या वेळी व्यक्त केला.