आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार खर्च १ लाख कोटींपेक्षा जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जाेखीम वाढण्याची शक्यता असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे.
संसदेत सादर करण्यात आलेल्या मीडियम टर्म एक्स्पेंडिचर फ्रेमवर्क स्टेटमेंटनुसार चालू आर्थिक वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार ९.५६ टक्क्यांनी वाढून १,००,६१९ कोटी रुपये हाेणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर २०१६-१७ च्या पगारात १५.७९ टक्के वाढ हाेऊन तो १.१६ लाख कोटी रुपये होणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले, तर २०१७-१८ मध्ये तो वाढून १.२८ लाख कोटी रुपये होणार आहे. अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी या सरकारसाठी आर्थिक जोखमीच्या ठरणार आहेत. या वाढीवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.