आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Unique Hotel Built On The Theme Of The Library, And Fell In Portugal 45 Thousand Books Treasure

वाचनालयाच्या थीमवर उभारले अनोखे हॉटेल,पोर्तुगालच्या हॉटेलात 45 हजार पुस्तकांचा खजिना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओबिडोस (पोर्तुगाल) : पाहुण्यांच्या स्वागतासाठी जगभरातील हॉटेल्स अनेक कर्मचारी कामाला लावतात किंवा विविध सुविधा त्यांना पुरवल्या जातात. परंतु पोर्तुगालमधील ओबिडोस येथील हॉटेल या सर्वांपेक्षा वेगळे आहे. कारण येथील ४५ हजार पुस्तके लोकांना हॉटेलमध्ये वारंवार येण्यास भाग पाडतात. ७०० वर्ष जुन्या मध्ययुगीन काळातील ओबिडोसमध्ये या हॉटेलने सुरूवातीला केवळ १० हजार पुस्तके ठेवली होती. ३० खोल्यांच्या या हाॅटेलमध्ये प्रत्येक भिंतीवर पुस्तकांसाठी शेल्फ दिसून येतात.

लाइब्रेरी थीमवर बनलेल्या ‘लिटररी मॅन’ हॉटेलमध्ये लाइव्ह किचनची व्यवस्था आहे. येथे पाहुणे पुस्तके वाचत असतात आणि खानसामे स्वयंपाक बनवून त्यांना आणून देतात. याला ‘लाइव्ह बुक अँड कुक किचन’ सुविधा म्हटले जाते. येथे अनेक पुस्तकांची मूळ प्रत आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्यांनाही वाचन करत जेवणाचा आनंद घेता यावा म्हणून वातावरणही तसेच निर्माण करण्यात आले आहे.

येथील बहुतांशी पुस्तके इंग्लिशमध्ये आहेत. याशिवाय काही पुस्तके पोर्तुगाली, फ्रेंच, जर्मन आणि दुसऱ्या भाषेतही आहेत. ग्राहकांना हवी तशी सेवा द्यावी म्हणून ही नवीन कल्पना समोर आल्याचे हॉटेलचे संचालक सांगतात. या हॉटेलात जगातील महत्त्वाच्या लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार पुस्तके लोकांना वाचायला मिळतात. विशेष म्हणजे एखाद्याला पुस्तक भेट द्यायचे असेल तर तो भेट देऊ शकतो. अशाच प्रकारे आवडलेले पुस्तक नेण्याची मुभाही देण्यात आली आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मते, अनेक ग्राहक त्यांच्याकडील महत्त्वाची पुस्तके हॉटेलच्या वाचनालयात ठेऊन जातात. या वर्षीच्या शेवटीपर्यंत पुस्तकांची संख्या एक लाखांच्या वर जाऊ शकते. पाहुण्यांच्या सोयीसाठी बार, सलून आणि रेस्टारंटमध्येही साहित्यिक वातावरण बनवण्यात आले आहे. अनेक कॉकटेलची नावेही दिग्गज साहित्यिकांच्या नावांवर ठेवण्यात आली आहेत. लेदर खुर्च्या, डेस्क कॉर्नर्सची सुविधा आहे. जेणे करून वाचताना कुठलीही अडचण येऊ नये.
बातम्या आणखी आहेत...