आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाची पत दुष्काळाहाती, अपुऱ्या पावसाचे व्यवस्थापन हे भारतासमोर आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशभरातील मान्सूनची सध्याची वाटचाल पाहता, दुष्काळ टळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाच्या वार्षिक सरासरीतील तफावत व अनियमितता यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण येणार आहे. दुष्काळ किंवा अपुरे पर्जन्यमान या स्थिती हाताळणी कशी होते यावर भारताचे सार्वभौम पतमानांकन अवलंबून राहील असे मत मुडीजने व्यक्त केले आहे.
महागाई, अन्नधान्य पुरवठा, शेतीवर अवलंबून असणारी मोठी लोकसंख्या व बिगर शेती क्षेत्रातील रोजगार संधींचा अभाव यासाठी सरकार कशी पावले टाकते यावरही पतमानांकन अवलंबून असल्याचे मुडीजने म्हटले आहे. एकूण दुष्काळाची हाताळणी कशी होते यावर देशाचे सार्वभौम पतमानांकन ठरणार आहे.
मुडीजने दुष्काळ व पतमानांकतील आव्हाने विषयाचा अहवाल सादर केला आहे. त्यात पाऊस, शेती, दुष्काळ व अर्थव्यवस्था यांच्यातील संबंधांची निरीक्षणे नोंदवली आहेत. अहवालानुसार, यंदा जरी दुष्काळाची तीव्रता जास्त नसली तरी अपुऱ्या पर्जन्यमानाचे संकट भारतासमोर आहे. दुष्काळामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) घटते, महागाई वाढते आणि आर्थिक ताण निर्माण होतो. त्यामुळे सध्या सुरळीत असणाऱ्या देशाअंतर्गत पतधोरणावर त्याचा परिणाम होतो. अर्थव्यवस्थेत अस्थैर्य येते.
प्रगतीतील अडथळे
कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व
बिगर कृषी क्षेत्रातील रोजगार संधींचा अभाव
ग्रामीण भागात अपुऱ्या पायाभूत सुविधा
दर्जेदार बी-बियाणे, खते, विविध अवजारे यांची कमतरता
वाढती अन्नधान्य महागाई
सिंचनाच्या सोयीचा संकुचित विस्तार
अल्पभूधारकांची
मोठी संख्या
ग्रामीण भागात
विजेचा तुटवडा
शेतीमाल
विपणनातील त्रुटी

मुडीजने सुचवलेले उपाय
ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी सरकारने पुढाकार घ्यावा
सिंचनाच्या सोयी वाढवाव्यात
अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी
उत्पादकता वाढवून शेतीतील अस्थैर्य कमी करावे
बिगर शेती क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्यात

दुष्काळ : भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम
अन्नधान्य उत्पादन घटते
महागाई वाढते
जीडीपीची वाढ खुंटते

सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढतो, बेरोजगारी वाढते
मुडीजने सध्या भारताला दिलेले मानांकन : Baa3
दर्जा : गुंतवणुकीसाठी सर्वात खालची श्रेणी
कृषीवर मोठा भार
मुडीजच्या मते, भारताच्या जीडीपीत कृषी क्षेत्राचा वाटा १८ टक्के आहे. शेतीवर अवलंबून असणारी, रोजगार मिळवणारी लोकसंख्या मोठी आहे. ग्रामीण भागात अपुऱ्या पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण थोडे जरी कमी झाले तरी त्याचा ताण अर्थव्यवस्थेवर येतो.

...तर पत सुधारणार
भारताला मुडीजने सध्या बीएए-३ असे पतमानांकन दिले आहे. गुंतवणुकीसाठीचा हा सर्वात खालचा स्तर मानला जातो. हेच पतमानांकन असलेल्या बांगलादेश, इजिप्त, पाकिस्तान व व्हिएतनाम यांसारख्या देशांच्या तुलनेत भारताला पतमानांकन उंचावण्यास संधी आहेत. जर सरकारने योग्य पावले टाकली तर पत उंचावेल, याकडे मुडीजने लक्ष वेधले.