आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएल कंपनीच्या प्रायोजकत्वाने ‘स्पिरिट्स’ यूथ फेस्टिव्हलचे मुंबईत यशस्वी आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी मुंबई - रोटरी क्लब, न्यू बॉम्बे सी-साइडच्या वतीने ते २८ आॅगस्ट दरम्यान तीन रविवारी विद्यार्थ्यांसाठी “स्पिरिट्स’ नावाने आंतरशालेय यूथ फेस्टिव्हलचे आयोेजन करण्यात आले होते. नेरूळच्या अग्रकोळी भवनमध्ये आयोजित या समारोहात नवी मुंबईतील सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कला सादर करण्याची संधी मिळाली. या फेस्टिव्हल दरम्यान कथा-कथन, भाषण, गायन, नृत्य आणि स्किट्स, निबंध लेखन, लघुकथा लेखन, कविता लेखन, कॅलिग्राफी, चित्रकला, पोस्टर मेकिंग, कोलाज यासह ४४ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांमधील सुमारे २,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यूपीएल लिमिटेड कंपनी या कार्यक्रमाची प्रायोजक होती. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाला मदत करत असून पुढील काळातही करत राहणार असल्याचे कंपनीचे संचालक (फायनान्स) अरुण अशर यांनी या वेळी सांगितले. या समारोहाची सुरुवात १३ वर्षांपूर्वी झाली होती. या १३ वर्षांच्या कालखंडात दरवर्षी या स्पर्धेचे स्वरूप वाढतच आहे. समारोहाच्या शेवटच्या दिवशी विविध स्पर्धा प्रकारांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. प्रत्येक श्रेणीमधील सुरुवातीच्या तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या शाळेला सर्वसाधारण विजेतेपदाचे स्मृतिचिन्ह देण्यात आले. या वर्षी हा मान २९० अंक मिळवणाऱ्या नेरूळच्या एसबीआेए स्कूलने मिळवला आहे. द्वितीय पुरस्कार न्यू पनवेलच्या डीएव्ही स्कूलला तर नेरूळच्या डीएव्ही पब्लिक स्कूलला तृतीय पुरस्कार मिळाला. या वेळी स्पिरिट्स २०१६ चे प्रकल्प अध्यक्ष के. व्ही. सुब्रमण्यम, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. चंद्रशेखर कोल्वेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...