आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतवर्षीच्या तुलनेत मार्चमध्ये भाज्यांचे दर निम्म्याने घटले, दुष्काळी परिस्थितीमुळे वाढले होते दर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - उन्हाळ्यास सुरुवात झाली असली तरी भाज्यांच्या दरात अद्याप तरी मोठी वाढ झालेली नाही. मात्र, दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गतवर्षी मार्चमध्ये भाज्यांच्या दरात दुप्पट ते अडीच पटीने वाढ होती. गेल्या दीड महिन्यात पडलेले टोमॅटोचे दर सद्य:स्थितीत किंचितसे वधारलेले अाहेत. 
 
गेल्या चार वर्षांतील परिस्थिती पाहता भाज्यांच्या दरात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच दरामध्ये मोठी वाढ होण्यास सुरुवात होत होती. उन्हाळ्याच्या दाहकतेच्या तुलनेत भाज्यांचे दर वाढत होते. बहुतांश भाज्या तर बाजार व ताटातूनही गायब होत असल्याचे चित्र असायचे. मार्चमध्येही भाज्यांच्या दरात मोठी वाढ होत होती. या वेळी मात्र, परिस्थितीमध्ये थोडासा फरक असल्याचे दिसत आहे. मार्च महिना सुरू झाला तरी भाज्यांचे दर मध्यम स्वरूपाचे आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक परिस्थिती आहे.  
 
हिरवी मिरची, सिमला मिरची, दोडके, वांगे, मेथी, कोथिंबीर, शेपू, चुका, टोमॅटो, कांदा, गवार, शेवगा आदी भाज्यांच्या दरात मार्च सुरू होऊनही विशेष मोठी वाढ झालेली नाही. डिसेंबर व जानेवारीमध्ये तर भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. पालेभाज्या तर अगदी बेभाव विक्री कराव्या लागत होत्या. आताही परिस्थितीमध्ये विशेष फरक जाणवत नसला तरी दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत दरांमध्ये मोठा फरक नाही. 
 
टोमॅटोमध्ये वाढ   
गेल्या दीड महिन्यात टोमॅटोने उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले होते. त्यावेळी विक्री होत नसल्यामुळे शेतकरी टोमॅटो फेकून देत होते. नंतरच्या काळात दहा रुपयाला तीन किलोपर्यंत दर पोहोचला होता. सध्या पाच ते सात रुपये किलोवर दर स्थिरावला आहे. शहरातील दुकानांमध्ये १० रुपये दर मिळत आहे.  
 
यामुळे दर स्थिर   
गतवेळी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. शेतीला पाणी मिळणे तर अशक्य होते. कूपनलिकांना थोडेफार पाणी असलेले शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत होते. या वेळी मात्र, जोरदार पाऊस बरसल्यामुळे सर्व जलस्रोतांना पाणी आहे. मात्र, प्रमुख पीक असलेला ऊस नाही. यामुळे भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परिणामी अधिक उत्पादन झाले आहे.

अधिक उत्पादन असल्यामुळे दर वाढीची अपेक्षा नाही  
गेल्या वर्षी मार्चमध्ये भाजीपाल्याला आतापेक्षा दुप्पट ते अडीचपट दर होता. या वेळी अधिक उत्पादन असल्यामुळे दरात फारशी वाढ झालेली नाही. पाणी असल्यामुळे वाढ होण्याची अपेक्षाही नाही - तानाजी सोनटक्के, शेतकरी.   
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, भाज्‍यांचे आताचे दर व गतवर्षीचे दर 
 
बातम्या आणखी आहेत...