आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व वाहनांमध्ये रिअर व्ह्यू सेन्सर अनिवार्य होणार; लवकरच अधिसूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्वच नवीन गाड्यांना आता रिअर व्ह्यू सेन्सर किंवा बॅकअप कॅमेरा अनिवार्य केला जाणार आहे. सरकार लवकरच याबाबत अधिसूचना जारी करेल, अशी माहिती रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव अभय दामले यांनी दिली आहे. दामले म्हणाले की, बहुतांश कारला मागच्या बाजूने आरसा असतो.

त्यामुळे कारचालक मागील अन्य वाहने पाहू शकतो. परंतु या आरशात कारच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये येणारी लहान मुले किंवा जमिनीलगतच्या वस्तू दिसत नव्हत्या. म्हणूनच मंत्रालयाने सर्व वाहनांना रिअर व्ह्यू सेन्सर एअरबॅग अनिवार्य करण्याचे ठरवले आहे, असे दामले यांनी इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या कार्यक्रमात सांगितले. ऑक्टोबर २०१८ पासून सर्व वाहनांना ऑटोमेटेड चाचणीतून जावे लागेल. तोपर्यंत वाहनचालक परवाना तपासणीसुद्धा पूर्णपणे यंत्र आधारित होईल. सरकारने एप्रिल २०१९ पर्यंत दुचाकींंमध्ये अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम किंवा कंबाइंड ब्रेकिंग सिस्टिम अनिवार्य आहे.

अपघातातमदत करणाऱ्यांना संरक्षण : दामलेयांनी सांगितले, नवे मोटर वाहन विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर केले जाईल. अपघातावेळी मदत करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची तरतूद यात असेल. यानुसार मदत करणाऱ्या व्यक्तीला एकदाच जबाबासाठी बोलवता येईल. त्यानंतर गरज भासल्यास न्यायिक किंवा पोलिस अधिकारी स्वत: त्याच्या घरी जाऊन जबाब घेतील.

वेग वाढल्यास आवाज होईल
अतिवेगामुळे देशात दरवर्षी ५० हजारांपेक्षा अधिक गंभीर रस्ते अपघात घडतात. याच दृष्टिकोनातून आता वाहनांमध्ये वेगाचा इशारा देणारे आवाज यंत्र बसवण्याचा नियम लावला जाईल. ताशी ८० किलोमीटरच्या वेगावर हे आवाज यंत्र बारीक बीपने इशारा देईल तोच वेग ताशी ९० किलोमीटरवर गेल्यास या बीपची तीव्रताही वाढत जाईल.
बातम्या आणखी आहेत...