आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहनांवर लागेल डिजिटल टॅग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता नवीन वाहनांवर डिजिटल ओळख टॅगची सुविधा राहणार आहे. यामुळे देशात टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक भरणा शक्य होणार आहे. टोल भरण्यासाठी वेळ कमी लागणार असल्यामुळे हायवेवरील लांबच लांब रांगा कमी होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या वतीने ऑटोमोबाइल कंपन्यांना नवीन वाहनांवर डिजिटल ओळख टॅग लावण्याचे निर्देश दिले आहेत. देशात कॅशलेस तसेच डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० आणि ५०० रुपयांच्या मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवहारात पारदर्शकता तसेच काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी दिली. रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने सर्व वाहन निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सर्व गाड्यांवर ‘रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन’ (आरएफआयडी) सुविधा देण्याचे निर्देश दिले असल्याचे दास यांनी सांगितले. यामुळे टोलनाक्यावर डिजिटल भरणा करता येणार आहे. यामुळे रांगा लावून वाट पाहण्यापासून नागरिकांची सुटका होईल.
बातम्या आणखी आहेत...