आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्‍ल्‍यांना भारतात परतायचे, म्‍हणाले- पासपोर्ट रद्द झाल्‍याने अडचण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बँकांचे कर्ज थकवून लंडनमध्ये मुक्कामी असलेले उद्योगपती विजय माल्ल्या यांना भारतामध्ये परत यायचे आहे. मात्र, त्‍यांचा पासपोर्टच रद्द केल्यामुळे भारतात परतण्याची अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती विजय माल्ल्या यांनी शुक्रवारी कोर्टात दिली आहे.
- माल्ल्यांच्‍या वकिलाने पतियाला कोर्टात सांगितले की, माल्‍या भारतात येण्यास तयार आहेत.
- भारत सरकारने माल्‍ल्यांचा पासपोर्ट रद्द केल्याने त्यांना भारतात परतणे शक्य नाही.
- माल्ल्यांच्या वकिलाने कोर्टात हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली.
- त्यावर कोर्टाने सक्तवसुली संचालनालय म्‍हणजे ईडीकडे उत्तर मागितले आहे.
- आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.
माल्‍यांच्‍या या संपत्‍तीवर कारवाई..
‘ईडी‘ने माल्ल्यांची 6630 कोटी रुपयांच्‍या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्‍ये माल्‍या यांचे अलिबागमधील फार्महाउस, फ्लॅट बॅंकांमधील एफडी आणि शेअर्सचा समावेश आहे. ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. याआधी 1400 कोटी रुपयांची मालमत्‍ता जप्‍त केली होती. आतापर्यंत ईडीने माल्‍या कुटुंबीयांची एकूण 8044 कोटी रुपयांची मालमत्‍ता जप्‍त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...