आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्यांचे \'ट्विटर\' अकाउंट हॅक; प्रॉपर्टी, बँका आणि पासवर्डची माहिती उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील बँकांना हजारो कोटींना चूना लावणारे मद्यसम्राट विजय माल्यांचे 'ट्विटर अकाऊंट' हॅक झाले आहे. 'लिझन ग्रुप'ने विजय माल्यांचे 'ट्विटर अकाऊंट' हॅक केले आहे. विशेष म्हणजे हॅकर्सनी माल्यांची प्रॉपर्टी, बँक आणि पासवर्डची माहिती उघड केली आहे.

विजय माल्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपला ई-मेल अकाऊंटही हॅक करण्यात आला असून ब्लॅकमेल केले जात असल्याचे माल्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'लिझन ग्रुप'ने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट देखील याच गृपने हॅक केले होते.

माल्या यांनी हॅकर ग्रुपला म्हटले, मी तुम्हाला शोधून काढेल...
- विजय माल्या यांनी शुक्रवारी ट्वीट करून "मेरा अकाउंट लीझियन नामक हॅकर्सनी हॅक केले आहे. ते माझ्या नावाने 'ट्वीट' केले आहे.
- या ग्रुपने माझे ईमेल अकाउंट हॅक केले आहे. मला ते ब्लॅकमेल केले आहे.
- हॅकर्सने विदेशातील अॅड्रेस, ई-मेल, पासवर्ड आणि फोन नंबर देऊन हे माल्याचे असल्याचा दावा केला आहे.

# या ग्रुपने केव्हा आणि किती केले ट्वीट?
-या ग्रुपने शुक्रवारी माल्यांच्या अकाउंटवरून 10 पेक्षा जास्त ट्‍वीट केले.
- एका ट्वीटमध्ये ग्रुपने म्हटले आहे की, या गुन्हेगाराबाबत (विजय माल्या) आणखी माहिती देणार आहे.
- एका दुसर्‍या ट्वीटमध्ये माल्यांचे ईमेल, ट्विटर, स्काइप आणि यू-ट्यूबच्या अकाउंट्सचे यूजरनेम आणि पासवर्डची माहिती दिली आहे.
- आणखी एका ट्वीटमध्ये हैकर्सने माल्याच्या यूके रेसिडेन्सी परमिटचे फोटोज शेअर केले आहे.

# अनेक बॅंंकांना चुुना लावून विजय माल्या फरार...
- विजय माल्यांंकडे अनेक बँँकांची जवळपास 9000 कोटी रुपयांची थकबाकी आहे. माल्यांंनी 3 मार्चला ब्रिटनला पलायन केले होते.
- माल्या हे राज्यसभेचे खासदार होते. पलायन करण्यापूर्वी ते संंसदेच्या कार्यवाहीत सहभाागी झाले होते.
- ब्रिटनमध्ये पलायन केल्यानंतर त्यांंचे सदस्यत्व रद्द करण्‍यात आले आहे. बँकांंची थकबाकी न चुकवल्याने त्यांना कोर्टाने फरार घोषित केले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, माल्यांचे ईमेल, ट्विटर, स्काइप आणि यू-ट्यूबच्या अकाउंट्सचे यूजरनेम आणि पासवर्ड...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...