आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात चांगल्या वाढीसाठी कळीच्या मुद्द्यांची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारात कळीच्यामुद्द्यांची वानवा, आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली स्थिरता आणि अमेरिकेत राष्ट्रपती निवडणूक जवळ आल्याने देशातील शेअर बाजारात सतर्कता दिसत आहे. गुंतवणूकदार सध्या बाजारापासून दूर राहण्यात धन्यता मानत आहेत. मोठा व्यवहार केला जात नसल्याचे चित्र आहे. तसेच या महिन्याच्या शेवटी दिवाळी आणि मासिक वायदा सौद्यांची एक्स्पायरी डेट असल्याने बाजारात सावधपणे व्यवहार होत आहे. मंगळवारी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटवण्यात आल्याची बातमी पसरल्यानंतर बाजार दबावात आहे. वास्तविक पाहता बाजाराला याची कल्पनाही नव्हती. टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्सवर जास्त परिणाम पाहायला मिळाला. एनएसईमध्ये टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक म्हणजेच २.७ टक्क्यांनी पडून बंद झाले. टाटा पॉवर, टीसीएस आणि टाटा मोटर्सचे शेअर्स १-२ टक्के पडून बंद झाले.

कंपनीच्या तिमाही निकालानेही बाजारात निराशाजनक वातावरण आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम ऑपरेटर असलेल्या आयडिया सेल्युलरने सोमवारी सोमवारी सप्टेंबरमधील तिमाही नफ्यात ८८ टक्के घसरण झाल्याची माहिती दिली होती. या बातमीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ३.६ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. याच पद्धतीने अॅक्सिस बँकेनेही थकीत कर्जात वाढ झाल्यामुळे दुसऱ्या तिमाहीत ८३ टक्के नफा घटल्याचे म्हटले होते. यावरून देशातील बँका १३८ अब्ज डॉलरच्या थकीत कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याचे दिसते. टेलिकॉम टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनी भारती इन्फ्राटेलने दुसऱ्या तिमाहीत त्यांचा नफा २१ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले होते. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये टक्के वाढ नोंदवण्यात आली.

एचडीएफसी बँकेनेही दुसऱ्या तिमाहीत २० टक्के नफा झाल्याचे घोषित केले होते. बाजारातील अंदाजापेक्षा हे अधिक आहे. एकंदरीत बाजारात चांगली वाढ पाहायची असेल तर कळीच्या मुद्द्यांची गरज आहे. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीने जागतिक बाजारांना ज्वर चढला आहे. वास्तविक पाहता निवडणुकीच्या अगोदरच हिलरी क्लिंटन या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे जाताना दिसत आहेत. निवडणुकीचा निकाल येईपर्यंत बाजारातील व्यवहार एकतर्फी राहण्याची शक्यता आहे.

बाजार पुन्हा एकदा व्यावसायिक मर्यादेत आला आहे. बाजार जोपर्यंत ही मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत व्यवहार एका मर्यादेत होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला ८,७३४ अंकांच्या जवळपास मजबूत आधार मिळेल. निफ्टीचा कल ही बाब निश्चित करेल. निफ्टी जर चांगल्या व्हॉल्यूमसह हा स्तर पार करत असेल तर बाजारात चांगली खरेदी पाहायला मिळेल. अशा स्थितीत निफ्टीला ८,८०९ च्या जवळपास आधार मिळेल. यानंतर निफ्टीला पुढील आधार ८,८९५ च्या जवळपास मिळेल. हा चांगला आधार होऊ शकतो. घसरणीबद्दल बोलायचे झाल्यास िनफ्टीला पहिला आधार ८६५० अंकांच्या जवळपास मिळेल. हा एक प्रमुख आधार म्हणता येईल. जर निफ्टी याच्या खाली बंद झाला तर कमकुवत ठरू शकतो. याला पुढील आधार ८,६०१ च्या जवळपास मिळेल. परंतु हा सुद्धा एक मध्यम आधार असेल. एकंदरीत निफ्टीचा उच्च स्तर ८,७३४ आणि ८,६५० च्या खालील स्तरावर नजर ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या बंद स्तराच्या ८,६९१.३० तो खूप जवळ आहे.

शेअर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या आठवड्यात महिंद्रा अँड महिंद्रा आणि टायटन कंपनी चार्टवर चांगले दिसत आहेत. एम अँड एमचा सध्याचा बंद भाव १,३०३.९० रुपये आहे. तो १,३३६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत याला १,२७८ रुपयांवर आधार मिळेल. टायटन कंपनीचा सध्याचा बंद भाव ३७२.७० रुपए आहे. तो ३८३ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीमध्ये याला ३६४ रुपयांवर आधार मिळेल.
(लेखक तांत्रिक विश्लेषक moneyvistas.com चे सीईओ आहेत.)
बातम्या आणखी आहेत...