आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका, भारतातील व्याजदरावर बाजाराचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात स्थानिक बाजारातील निर्देशांक आणि शेअर, जागतिक बाजारातील स्थितीनुसार पडझडीसह बंद झाले. चीनमधील पडझड सध्या पूर्णपणे संपलेली नाही, ही चिंता वाढल्याने जगभरातील शेअर बाजारात पडझड नोंदवण्यात आली. तर, अमेरिकेतील व्याजदर वाढवण्याची शक्यता कायम आहे. बाजारातील खरेदीवरदेखील याची छाप पडली. देशांतर्गत बाजाराची चर्चा केली तर सध्या कोणताही मुख्य प्रवाह दिसत नाही. यामुळे जागतिक पातळीवरील संकेतांवर सर्व अवलंबून आहे. यामुळेच एका बाजूने पडझड झाल्याची नोंद झाली आहे. मंगळवारी मात्र खालच्या स्तरावर झालेल्या खरेदीमुळे मोठी उसळी दिसून आली. सध्या तरी बाजारातील पडझड संपली असल्याची लक्षणे दिसून येत नाहीत.

सध्या बाजाराचे सर्व लक्ष दोन महत्त्वाच्या ट्रिगरवर आहे. त्यातील पहिले म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या वतीने व्याजदरात अचानक केलेली कपात आणि दुसरे संसदेच्या विशेष अधिवेशनात (जर बोलावले तर) जीएसटी बिल मंजूर होणे. या दोन्ही शक्यता येणार्‍या काळात प्रत्यक्षात अमलात येऊ शकतात. यामुळे याची आतुरतेने वाट पाहण्यात येत आहे. बाजार अमेरिकेत होणार्‍या घटनांवरदेखील लक्ष ठेवेल. फेडरल रिझर्व्हची बैठक १६-१७ सप्टेंबरला होणार आहे. यानंतर व्याजदरात वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे पाहिले तर व्याजदरात वाढ करण्यावरून विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञ वेगवेगळी मते व्यक्त करत आहे.
अर्थतज्ज्ञांच्या एका मोठ्या वर्गाला असे वाटते की, सध्या अमेरिका व्याजदरात वाढ करणार नाही. मात्र, आर्थिक निर्देशांकाचा हवाला देत दुसरे अर्थतज्ज्ञांना वाटते की, या बैठकीत व्याजदर वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अमेरिकेतील जाहीर झालेली आकडेवारी सध्या तेथील अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट करते. तसेच याचप्रमाणे येणार्‍या काळातील स्थितीदेखील कायम राहण्याची शक्यता आहे. याच दरम्यान वर सांगितलेल्या ट्रिगरव्यतिरिक्त भारतातील घाऊक आणि किरकोळ महागाई दर तसेच औद्योगिक उत्पादनाची आकडेवारीदेखील जाहीर होईल.

तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर देशातील शेअर बाजारात सध्या तरी निराशेचे वातावरण आहे. जागतिक बाजारातील स्थिती याचे मुख्य कारण असून, यात कोणतेच विशेष संकेत मिळत नाहीयेत. यामुळे या आठवड्यात बाजारात माेजक्या स्वरूपात खरेदी होण्याची शक्यता आहे. निफ्टीला वरती ७८४४ अंकांच्या जवळ रेझिस्टन्स मिळेल. हा एक महत्त्वाचा रेझिस्टन्स असेल. या पातळीवर काही प्रमाणात नफारूपी विक्री होऊ शकते. जर या पातळीवर व्हॉल्यूमसह खरेदारी झाली तर रेझिस्टन्स कमजोर हाेईल. निफ्टी या पातळीच्या वरती बंद झाला तर आणखी वाढ दिसण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत याला पुढचा रेझिस्टन्स ८०९७ अंकांच्या जवळपास मिळेल. हा एक मजबूत रेझिस्टन्स असेल. सध्याच्या स्थितीत निफ्टीला याच्या वरती जाण्यासाठी मोठ्या घडामोडीची आवश्यकता असेल.

पडझडीकडे पाहिले तर निफ्टीला पहिला अर्थपूर्ण आधार ७६३९ - ७५९७ अंकांच्या दरम्यान मिळेल. यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असेल. जोपर्यंत निफ्टी या पातळीवर कायम आहे तोपर्यंत बाजार सकारात्मक असल्याचे मानावे. मात्र, जर निफ्टी या पातळीच्या खाली येऊन बंद झाला तर आधार खाली येऊन ७५४१ अंकांच्या जवळपास येईल. हा एक मध्यम आधार असेल. याच्याही खाली आल्यास मोठ पडझड होण्याची शक्यता आहे.

शेअरमध्ये या आठवड्यात एलआयसी हाउसिंग फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो चांगल्या स्थितीत दिसून येत आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सचा सध्याचा बंद भाव ४१६.७० रुपये आहे. तो ४२८ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. खाली त्याला ४०२ रुपयांवर आधार मिळेल. एल अँड टीचा संध्याचा बंद भाव १,५६४.५० रुपये आहे, जो १,५९१ रुपयांपर्यंत वाढू शकतो. याला खाली १,५२६ वर आधार मिळेल.

विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in