आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईसह औद्योगिक उत्पादनावर राहील लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शेअरबाजारात मंगळवारी जोरदार तेजी नोंदवण्यात आली. प्रमुख निर्देशांक १८ महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाले. अमेरिकेतील रोजगाराची शुक्रवारी जाहीर झालेली आकडेवारी नकारात्मक आली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. ऑगस्टमध्ये अमेरिकेत सुमारे १.५२ लाख रोजगार वाढले असून त्या आधीच्या दोन महिन्यांचा विचार करता यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रोजगाराची आकडेवारी सुधारल्यास तसेच अर्थव्यवस्थेत तेजी दिसल्यास सप्टेंबरमध्ये व्याजदरात वाढ करणार असल्याचे संकेत फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जेनेट येलन यांनी गेल्या महिन्यात दिले होते.

अमेरिकेत शुक्रवारी रोजगार आकडेवारी जाहीर झाल्यानंतर या महिन्यात व्याजदरात वाढ होण्याची फक्त २१ टक्के शक्यता असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. याआधी २४ टक्के शक्यता वर्तवण्यात येत होती. चिंता कमी झाल्यामुळे विदेशी फंडांच्या वतीने भारतीय शेअर बाजारात नव्याने खरेदी सुरू केली. विकसनशील देशांबरोबरच भारतीय शेअर बाजारात देखील विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक वाढवत आहेत. चालू वर्षात आतापर्यंत ६.०५ अब्ज डॉलरची शुद्ध खरेदी झाली आहे. एकूण विचार केल्यास शेअर बाजाराची धारणा सकारात्मक आहे. पुढील काळात निफ्टीमध्ये कन्सॉलिडेशन आणि तांत्रिक करेक्शनच्या शक्यतेमध्ये देखील बाजारात आणखी तेजी दिसण्याची शक्ती कायम आहे. या आठवड्यात निफ्टी ९००० अंकाची पातळी गाठू शकतो. मात्र, त्या आधी भारतीय अर्थव्यवस्थेत खरच तेजी आहे का, हे पाहण्यासाठी बाजार महागाई दर आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी येण्याची वाट पाहणार असल्यामुळे या पातळीवर पोहोचणे तेवढे सोपे राहणार नाही. निक्केई इंडिया उत्पादन पीएमआय चांगल्या स्थितीत दिसल्यामुळे त्याची सुरुवातही सकारात्मक झाली आहे. आॅगस्ट महिन्यात हा निर्देशांक ५२.६ नोंदवण्यात आला आहे. या वर्षातील ही उच्चांकी पातळी आहे, तर सेवा क्षेत्रातील पीएमआयदेखील साडेतीन वर्षांत सर्वात चांगल्या स्थितीत आहे. हा ऑगस्ट महिन्यात ५४.७ नोंदवण्यात आला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ऑटो उद्योग तसेच ग्राहकी खर्चाचा महत्त्वाचा निर्देशांक मानली जाणारी वाहन विक्रीची मासिक आकडेवारीदेखील चांगली आली आहे. या सर्व सकारात्मक संकेतांमुळे बाजाराची धारणा मजबूत अाहे. या धारणेने बाजाराला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. असे असले तरी महागाई हीदेखील एक कमजोर बाजू आहे. महागाई दरात वाढ झाल्यास व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या आकड्यावर लक्ष ठेवावे. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला ८९९७ च्या जवळपास पहिला रेझिस्टन्स मिळेल. हा ९००० च्या मनोवैज्ञानिक पातळीच्या खूपच जवळ आहे. या पातळीवर काही प्रमाणात नफारूपी विक्री होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निफ्टीला या पातळीच्या पुढे जाणे सोपे ठरणार आहे. जर निफ्टी या पातळीच्या वरती गेल्यास, तो नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वाढणार आहे. तरी सध्याच्या स्थितीत ही फक्त दूरवरची शक्यताच आहे.

घसरणीत निफ्टीला पहिला आधार ८८१८ च्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल, त्यानंतर निफ्टीला महत्त्वपूर्ण आधार ८७६६ च्या जवळपास मिळेल. या पातळीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. जर निफ्टी या पातळीवर कायम राहण्यास यशस्वी झाला तर यामध्ये सकारात्मक संकेत तयार होतील. निफ्टी खाली आल्यास, अलीकडच्या काळात तेजी दिसणार नसल्याचे हे संकेत असतील.

शेअरमध्ये या आठवड्यात ओएनजीसी आणि एल अँड टी चांगल्या स्थितीत दिसत आहे. ओएनजीसीचा सध्याचा बंद भाव २३८.५५ रुपये आहे. हा २४५ रुपयांपर्यंत वाढू शकतो, घसरणीत याला २३१ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा. एल अँड टीचा सध्याचा बंद भाव १,५१६.४० रुपये आहे. हा १,५५२ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो, घसरणीत त्याला १,४६८ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा.
(vipul.verma@dbcorp.in)
(लेखक तांत्रिक विश्लेषक moneyvistas.com चे सीईओ आहेत.)
बातम्या आणखी आहेत...