आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांतरराष्ट्रीय घटनांवर राहील बाजाराचे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात (बुधवार ते मंगळवार) भारतीय शेअर बाजारातील शेअरचे दर आणि प्रमुख निर्देशांक दोन्ही मर्यादित राहिले. आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेेक चांगल्या बातम्या आल्यानंतरही बाजार अपेक्षेप्रमाणेच राहिला. वास्तविक मंगळवारी भारतीय बाजार सकारात्मक धारणेसह बंद झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात बदल केला नसला तरी यासाठी महागाई दरावर आमचे लक्ष असल्याचे सांगितले आहे. एप्रिलमध्ये महागाई दर ५.३९ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. मान्सूनमध्ये झालेल्या पावसानंतर खाद्यपदार्थांच्या किमती कमी होतात की नाही याची माहिती घेणे केंद्रीय बँकेसाठी आवश्यक आहे. यामुळेच आरबीआयच्या वतीने रेपो दराला पाच वर्षांतील सर्वात कमी ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याची व्यापक अपेक्षा होती.
पुढील काळात मला व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा वाटत असल्याचे मत गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केल्यामुळे बाजाराला दिलासा मिळाला. असे असले तरी खाण्यापिण्याच्या आणि इतर वस्तूंच्या किमतीमुळे चिंता कायम आहे. याव्यतिरिक्त राजन यांना सप्टेंबरनंतर पुढचा कार्यकाळ मिळेल की नाही याची चिंता बाजाराला आहे. अांतरराष्ट्रीय मुद्राकोश (आयएमएफ)चे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ असलेल्या राजन यांच्या कामाची जगभरात प्रशंसा केली जाते.
भारतीय बाजारात आर्थिक स्थितीचा विचार केल्यास वातावरण सकारात्मक अाहे. जीडीपीची चांगली आकडेवारी तसेच मान्सूनदरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज यांनी बाजारात उत्साह भरण्याचे काम केले असून अपेक्षादेखील वाढवल्या आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेत रोजगाराची आकडेवारी नकारात्मक आल्यानंतर व्याजदरात वाढ होण्याची गती मंदावण्याची अपेक्षा वाढली आहे. या सर्व बातम्यांमुळे भारतीय बाजारातील धारणा सकारात्मक झाली आहे. याशिवाय जगभरातून आलेल्या बातम्या जास्त उत्साहवर्धक नव्हत्या. आता ब्रिटनमध्ये २३ जूनला होणाऱ्या ब्रॅक्सिट रेफरंडम आणि जूनअखेर होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे बाजाराच्या नजरा लागल्या आहेत.
तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बाजार सध्या कन्सॉलिडेशनच्या टप्प्यात आहे. काही काळ बाजार मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता आहे. निफ्टीची चाल वरच्या दिशेने आहे. निर्देशांकाला ८३३७ अंकांच्या आसपास मोठा अडसर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या तेजीच्या लाटेची ही वरची पातळी म्हणता येईल. असे असले तरी निफ्टीला ८३१२ च्या आसपास तगडा अडसर मिळण्याची शक्यता आहे. घसरणीबाबत सांगायचे झाल्यास निफ्टीला ८२१४ च्या आसपास पहिला आधार मिळेल. हा एक मध्यम स्वरूपाचा आधार राहील. समजा ही पातळी तुटल्यास निफ्टीला ८१८५ वर पुढील आधार मिळेल. समजा निफ्टी या पातळीखाली येऊन बंद झाला, तर त्याला ८१३५ वर तगडा आधार मिळेल. सध्या तरी ही पातळी ट्रेडनिश्चितीसाठी आधार वाटते आहे. समभागांच्या बाबतीत या आठवड्यात एचडीएफसी आणि टीसीएच चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसीचा सध्या बंद भाव १२५१.३० रुपये आहे. हा १२७२ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत त्याला ११३४ रुपयांवर आधार आहे, तर टीसीएचचा सध्याचा बंद भाव २६३१.१५ रुपये आहे. हा २६६८ रुपयांपर्यंत मजल मारू शकतो. घसरणीत त्याला २५९१ रुपयांवर आधार आहे.

* लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.comचे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...