आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Visa Steel Is Going To Merge In Assistant Company

वीसाचा स्पेशल स्टील कारभार सहयोगी कंपनीत होणार हस्तांतरित, योजना तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - वीसा ग्रुपची कंपनी वीसा स्टील लिमिटेड हे स्पेशल स्टील, फेरो क्रोम आणी कोकचे या देशातील प्रमुख निर्माता आहेत. अशातच कंपनीला आपल्या कर्जदारांबरोबरच्या स्पेशल स्टील कारभाराला १०० टक्के अनुदानित कंपनीत रुपांतरीत (ट्रान्स्फर) करण्याची परवानगी मिळाली आहे. कंपनी आपला हा कारभार वीसा स्पेशल स्टील लिमिटेडमध्ये हस्तांतरीत करेल. कंपनीने ही योजना वीसा स्पेशल स्टील लिमिटेड मध्ये एक धोरणात्मक भागीदारास सहभागी करुन घेणे आणी भागधारकांना फायदा करुन देण्यासाठी बनवण्यात आली आहे.

वीला स्टीलने यापूर्वी २०१३ मध्ये आपला कोकचा कारभार १०० टक्के अनुदानित कंपनी वीसा कोक लिमिटेडमध्ये हस्तांतरीत करुन बसली आहे. आणी कंपनीचे धोरणात्मक भागीदाराच्या रुपात अमेरीकी कंपनी सनकोक एनर्जीला आमंत्रित केले होते. सन कोक एनर्जीने वीसा कोक लिमिटेडमध्ये ४९ टक्के भागीदारी खरेदी केली होती. वीसा स्टीलने या देण्याघेण्यामधुन ३७० करोडहून अधिक जास्तीची रक्कम जमवली होती. यानंतर तयार झालेल्या संयुक्त उद्योगचे नाव वीसा सनकोक लिमिटेड ठेवले गेले. यात वीसा स्टीलची ५१ टक्के भागीदारी आहे. वीसा स्टीलचा स्पेशल प्लांट ओडीशाच्या कलींगनगर इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्समध्ये आहे जे देशाचे सर्वात मोठ्या स्टील हबच्या रुपात पुढे येत आहे. हा संकुल लोह अयस्क कोळशाच्या खदाणी आणी पारादीप व धामरा बंदराच्याजवळ स्थित आहे. या बंदरातून कोकिंग कोल आयात होते. वीसा स्टीसच्या स्पेशल प्लांटची उत्पादनक्षमता ५ लाख टीपीए आहे. याला १० लाख टीपीएपर्यंत वाढवता येते. क्षमतेच्या आधारावर ही कंपनी जेएसडब्ल्यु सालेन आणी उषा मार्टीनच्या नंतर भारतात तिसरी सर्वात मोठी स्टीलची कंपनी असेल.

देशात स्पेशल (विषेश) स्टील लांग उत्पादनाचा बाजार जवळजवळ ५० लाख टीपीएचा आहे. यात पुढील ५ ते १० वर्षात कीत्येक पटीने नफा होण्याचे अनुमान आहे. यात ऑटो उद्योगाच्या मागणीचे मुक्य योगदान असेल. याशिवाय केंद्र सरकारने अशातच रेल्वे आणी संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचा मर्यादा (एफडीआई) वाढवण्यात आली आहे. यात त्या वैश्विक स्पेशल स्टील निर्माता कंपन्यांना आकर्षित केले गेले आहे. ज्या भारताच्या उभरत्या बाजारात भागीदारीच्या संभावना शोधत आहेत.