आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होडाफोन अन् आयडिया 7,850 कोटींत विकणार टॉवर व्यवसाय; देशात 4.54 लाख टॉवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर त्यांचा-त्यांचा टॉवर व्यवसाय एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला विक्री करणार आहे. हा व्यवहार ७,८५० कोटी रुपयांत ठरला आहे. हा पूर्ण व्यवहार २०१८ च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या वतीने संयुक्त प्रसिद्धिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. आयडियाचा टॉवर व्यवसाय आयडिया सेल्युलर इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस नावाने आहे. या विक्रीतून कुमारमंगलम बिर्ला समूहाच्या कंपनीला ४,००० कोटी रुपये मिळतील, तर व्होडाफोनला ३,८५० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.  

व्होडाफोन आणि आयडिया ही भारतातील दुसरी आणि तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुमारे २०,००० टॉवर आहेत. त्यांनी आपसात विलीनीकरणाचा करार आधीच केला आहे. या टॉवर व्यवसाय विक्रीचा विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नसल्याचे दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या संयुक्त प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 

या विलीनीकरणानंतर तयार होणारी कंपनी ३५ टक्के मार्केट शेअरसह देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी तयार होईल. हे विलीनीकरण २०१८ मध्ये पूर्ण होणार असल्याचे व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सूद यांनी सांगितले.  

आयडिया सेल्युलरवर सुमारे ५४,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. टॉवर व्यवसायाची विक्री करून कंपनीला कर्जातील मोठी रक्कम कमी करण्याची इच्छा आहे. सुमारे ४६,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सलादेखील त्यांच्या टॉवर व्यवसायाच्या विक्रीतून ११,००० कोटी रुपये जमा करण्याची इच्छा आहे. भारती इन्फ्राटेल, इंडस टॉवरमधील भागीदारी खरेदी करण्यास इतरही कंपन्या इच्छुक असल्याचे वृत्त गेल्या महिन्यात आले होते.   इंडस टॉवर्समध्ये अजूनही भारती इन्फ्राटेलची ४२ टक्के भागीदारी आहे. उर्वरित व्होडाफोन, आयडिया आणि प्रोव्हिडेन्स इक्विटी पार्टनर्स आहेत. भारती इन्फ्राचे सध्या ९०,९५५ टॉवर अाहेत. व्होडाफाेन आणि आयडिया यांच्यातील विलीनीकरणाचा करार झाला होता, त्याच वेळी टॉवर व्यवसाय विक्रीची शक्यता वर्तवण्यात आली होती.
 
इंडस टॉवर्स सर्वात मोठी टाॅवर कंपनी
> २७% इंडस टॉवर्स 
> १६% बीएसएनएल, एमटीएनएल
> १३% एटीसी
> ९% रिलायन्स इन्फ्राटेल
> ८% भारती इन्फ्राटेल 
> ६% जीटीएल इन्फ्रा
> २१% इतर 
(इंडस टाॅवर्समध्ये ४२% भागीदारी भारती इन्फ्राची आहे)
 
६ महिन्यांत आयडियाला २,१६० कोटींचा ताेटा, शेअर ३.६% घसरले  
सप्टेंबर २०१७ तिमाहीमध्ये आयडियाला १,२३७ कोटींचा तोटा (स्टँडअलोन) झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांतच २,१६० कोटींचे नुकसान झाले. २०१६-१७ मध्येही कंपनीला ८३१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. प्रतिग्राहक महसूल जून तिमाहीमध्ये १४१ रुपये होता, तो ६.६ टक्क्यांच्या घसरणीसह १३२ रुपये राहिला आहे. खराब निकालामुळे मुंबई शेअर बाजारातील शेअर ३.६ % घसरणीसह ९३.५५ रुपयांवर बंद झाले.  
 
विक्रमी तोट्याने आरकॉमचे शेअर वर्षभराच्या नीचांकी पातळीवर  
खराब तिमाही निकालाने अनिल अंबानी समूहाच्या आरकॉमच्या शेअरमध्ये सोमवारी १३.५ % घसरण होऊन शेअर १२.१५ रुपयांवर बंद झाले. दिवसभराच्या व्यवहारात या शेअरने १२.१० रुपयांची ५२ आठवड्यातील नीचांकी पातळीही गाठली. निकालात आरकॉमने सप्टेंबर तिमाहीत स्टँडअलोन अाधारावर १,८७७ कोटी व कन्सोलिटेडेट आधारावर २,७०९ कोटींचा तोटा झाला. जून तिमाहीमध्ये ृ ९६३ कोटी व गेल्या वर्षी १,७९६ कोटींचे नुकसान झाले आहे.  
 
पुढील स्‍लाईडवर वाचा, दरवर्षी टॉवर उद्योगात ६.८% वाढ...
 
बातम्या आणखी आहेत...