आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • WB Asserted Country Would Regain Momentum In The Following Years With 7.6 And 7.8% Growth

नोटबंदी परिणाम: भारताचा विकासदर घटला, जागतिक बँकेने 7% दर्शविला अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक बँकेने भारताच्‍या विकासदरात घसरण होऊन तो 7 टक्‍क्‍यावर येईल असा अंदाज वर्तविला आहे. - Divya Marathi
जागतिक बँकेने भारताच्‍या विकासदरात घसरण होऊन तो 7 टक्‍क्‍यावर येईल असा अंदाज वर्तविला आहे.
वॉशिंग्‍टन- नोटबंदीचा अर्थव्‍यवस्‍थेवर विपरित परिणाम झाल्‍याचे आता हळूहळू स्‍पष्‍ट होत आहे. आर्थिक वर्ष 2016-17मध्‍ये भारताचा विकासदर 7 टक्‍क्‍यापर्यंत कमी होईल असे  जागतिक बँकेने नुकत्‍याच जाहिर केलेल्‍या 'ग्‍लोबल इकॉनॉमिक प्रॉस्‍पेक्‍ट्स' अहवालामध्‍ये म्‍हटले आहे. याआधी जागतिक बँकेने भारताचा विकासदर 7.6 ते 7.8 टक्‍के राहिल असा अंदाज वर्तविला होता.
 
बँकेने असेही भाकित केले होते की, 2017-18 मध्‍ये देशाचा विकासदर 7.6 टक्‍के तर 2018-19 मध्‍ये 7.8 टक्‍क्‍यापर्यंत वधारेल. मात्र नोव्‍हेंबरमधील नोटबंदीच्‍या निर्णयानंतर भारत हा विकासदर गाठू शकणार नाही, असे बँकेने म्‍हटले आहे. नोटबंदीच्‍या निर्णयानंतर जागतिक बँकेने हा पहिलाच अहवाल जाहिर केला आहे. यामध्‍ये 2017मध्‍ये जागतिक विकासदर 2.7टक्‍के राहिल असे सांगितले आहे.
 
अहवालातील खास बाबी 
- जागतिक बँकेने म्‍हटले आहे की, भारत सरकाने चलनातून 500 व 1000 रुपयाच्‍या नोटा काढून घेऊन त्‍याजागी नविन नोटा आणल्‍यामुळे देशभरातील व्‍यवहार मंदावले आहेत. 
- यामुळे भारताच्‍या विकासदराचा वेग कमी झाला आहे. 31 मार्च 2017पर्यंतच्‍या आर्थिेक वर्षामध्‍ये भारताचा विकासदर 7 टक्‍के राहिल, असा अंदाज बॅंकेने वर्तविला आहे. 
- जागतिक बँकेने म्‍हटले आहे, 'नोटबंदीसोबतच तेलाच्‍या वाढलेल्‍या किंमती आणि कमी कृषी उत्‍पन्‍न यामुळे भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेसाठी आगामी काळ आव्‍हानात्‍मक असेल.'  
 
चीनपेक्षा जास्‍त आहे भारताचा विकासदर 
- जागतिक बँकेच्‍या अहवालानूसार जगात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये भारताने पुन्‍हा एकदा चीनला मागे टाकले आहे. 
-  जागतिक बँकेने म्हटले आहे, देशात उत्‍पादन वाढवण्‍यासाठी भारत सरकारतर्फे अनेक उपाययोजना राबविल्‍या जात आहेत. याचा चांगला परिणाम येत्‍या काही वर्षात दिसू शकेल. 
- अहवालानूसार भारत सरकारने अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये वेगाने सुधारणा केल्‍यास 2018 मध्‍ये विकासदर 7.6 टक्‍के आणि 2019 मध्‍ये 7.8 टक्‍के इतका वाढू शकतो. 
- चीनच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा वेग 2017 मध्‍ये 6.5 टक्‍के आणि 2018 मध्‍ये 6.3 टक्‍के राहिल असे अहवालामध्‍ये सांगितले आहे.
- जागतिक बँकेने जून 2016 मधील आपल्‍या अहवालतदेखील चीनबद्दल हाच अंदाज वर्तविला होता. 

'मेक इन इंडिया' मूळे होईल मदत 
- अहवालामध्‍ये जागतिक बँकेने भारताला सल्‍ला दिला आहे की, देशात जास्‍तीत जास्‍त गुंतवणूक यावी म्‍हणून सरकारने उद्योगांसाठी चांगले वातावरण तयार केले पाहिजे आणि  पायाभूत सूविधांवरील खर्च वाढविला पाहिजे.
- 'मेक इन इंडिया' कॅम्‍पेनमूळे देशातील उत्‍पादन क्षेत्राला मोठा लाभ मिळू शकतो. घरगुती उत्‍पादनांची वाढलेली मागणी आणि धोरणातील बदल या दोघांचाही उत्‍पादन क्षेत्राच्‍या विकासासाठी मदत होईल. 
- जागतिक बँकेने 'ग्‍लोबल इकॉनॉमिक प्रॉस्‍पेक्‍ट्स' अहवालामध्‍ये म्‍हटले आहे, कमी होणारी महागाई आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्‍यामूळे देशाचे एकूण उत्‍पन्‍न आणि खर्च करण्‍याच्‍या क्षमतेमध्‍ये वाढ झाली आहे. 
 
नोटबंदीमूळे बँकिगमध्‍ये जास्‍तीत जास्‍त लोक सहभागी होतील 
- जागतिक बँकेच्‍या अहवालानूसार, नोटबंदीमुळे बँकांना फायदा होईल. कारण जास्‍तीत लोक बँकांद्वारे व्‍यवहार पार पाडतील. 
- बँकांच्‍या राशीत वाढ होईल आणि कर्जही स्‍वस्‍त हेाऊ शकते. 
- यामुळे आर्थिक व्‍यवहारांत वाढ होईल. अर्थव्‍यवस्‍थेवर याचा चांगला परिणाम होईल.
- मात्र हा फायदा मिळवण्यासाठी देशाला आणखी काही काळ वाट पहावी लागेल. 
- सध्‍या भारतात 80 टक्‍के व्‍यवहार कॅशमध्‍ये होतात. मात्र नोटबंदीमूळे या व्‍यवहारांवर मर्यादा आल्‍याने त्‍याचा विपरित परिणाम काही काळ विकासदरावर पडणार आहे, असे जागतिक बँकेने म्‍हटले आहे.
 
नोटबंदीमूळे अर्थव्‍यवस्‍थेच्‍या सुधारणांवर होऊ शकतो परिणाम 
- वर्ल्‍ड बँकेने म्‍हटले आहे, नोटबंदीच्‍या निर्णयामूळे जनतेला त्रास सोसावा लागला आहे. याचा अर्थव्‍यवस्‍थेच्‍या इतर सुधारणांवर परिणाम होऊ शकतो. 
- 'वस्‍तू आणि सेवा कर', 'कामगार कायदा' आणि 'जमीन सुधारणा कायदा'  यांच्‍याबाबतीत मोदी सरकार बचावात्‍मक भूमिका घेऊ शकते. त्‍यामूळे संसदेत हे कायदे यावर्षी मंजूर होऊ शकणार नाहीत. अशी शक्‍यता जागतिक बँकेने व्‍यक्‍त केली आहे. 
- नोटबंदीचा परिणाम तिसऱ्या तिमाहीतील विकासदरावर झाल्‍याचे जागतिक बँकेने म्‍हटले आहे. याकाळात घटलेल्‍या औद्योगिक उत्‍पादनाचा परिणाम चौथ्‍या तिमाहीत (जानेवारी- मार्च 2017) दिसेल, असे जागतिक बँकेने म्‍हटले आहे. 
 
जागतिक विकासदर 2.7 टक्‍के राहण्‍याचा अंदाज 
- जागतिक बँकेने म्‍हटले आहे, 2017 मध्‍ये जागतिक विकासदर 2.7 राहिल. 
- अहवालानूसार आंतरराष्‍ट्रीय राजकारणातील अनिश्‍चततेमूळे देशा-देशांतील व्‍यापारामध्‍ये घसरण होऊ शकते.
- आगामी काळ जागतिक व्‍यापारासाठी आव्‍हानात्‍मक असेल, असे जागतिक बँकेने सांगितले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)