आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्याजदर कमी हाेण्याच्या अगाेदरच ‘एफडी’ करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मंगळवार, २ जून राेजी नाणेनिधी धाेरण जाहीर करतील. या वेळी ते काेणती घाेषणा करणार हे काेणालाही माहिती नाही. पण तुम्ही जर हुशार असाल तर स्वत:च त्याबाबतचा अंदाज बांधू शकता. व्याजदर कपातीतून वाचण्यासाठी राजन यांच्याकडे काेणतेही ठाेस कारण नाही. मागच्या अाठवड्यात केंद्र सरकारचे मुख्य अार्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीदेखील व्याजदर कमी हाेण्याची शक्यता असल्याचे म्हटले हाेते अाणि त्यांचे हे म्हणणे बराेबरही अाहे. जर राजन यांनी २ जूनला व्याजदरात कपात केली नाही तर त्यांना काही कालावधीनंतर ती करावी लागेल. या वर्षात कमीत कमी दाेन किंवा तीनदा व्याजदर कपात हाेण्याची शक्यता अाहे अाणि त्यातही एकूण एक टक्क्यापर्यंत व्याज कपात हाेऊ शकते.
हे का अावश्यक अाहे अाणि त्याच्या अगाेदर अापल्याला काय करणे गरजेचे अाहे यावर चर्चा करू. या वर्षात ज्या वेळी व्याज दरकपातीला सुरुवात हाेईल, त्या वेळी बँका मुदत ठेवींवरील (एफडी) व्याज कमी करण्यास सुरुवात करतील अाणि शेअर बाजारात नाेंदणीकृत राेख्यांच्या (लिस्टेड बाँड्स) किमती वाढतील. व्याजदर कमी झाल्यावर समभागांच्या किमती उसळतील. कंपन्यांच्या अार्थिक कामगिरीत सुधारणा दिसायला लागल्यावर शेअर दलालही समभागांचे पुनर्मूल्यांकन करताना बघायला मिळतील. सध्या एक वर्षाच्या मुदत ठेवीवर ८ ते ८.५ टक्के व्याज िमळत अाहे अाणि त्यापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवर यापेक्षा जास्त व्याज मिळत अाहे. त्याच वेळी शेअर बाजारातील नाेंदणीकृत करपात्र राेख्यांवर ८ ते १० टक्के मिळकत हाेत असून करमुक्त राेख्यांवर ७.२ ते ७.५ टक्के मिळकत हाेत अाहे. त्यामुळे व्याजदर कपातीला सुरुवात हाेण्याअगाेदर सध्या मिळणाऱ्या व्याजानुसार मुदत ठेवी किंवा राेख्यांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे अाहे.
जर अापण घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर हीच याेग्य वेळ अाहे, ज्या वेळी तुम्हाला बँकांकडून लवचिक व्याजदरानुसार कर्ज घेणे गरजेचे अाहे. जर तुम्ही निश्चित व्याजदराने कर्ज घेतले असेल तर बँक फार माेठा दंड अाकारणार नाही, असे मानून ते कर्ज बदलत्या व्याजदराकडे (फ्लाेटिंग रेट) ‘शिफ्ट’ करण्याच्या दृष्टीने विचार करू शकता. येणाऱ्या बारा महिन्यांमध्ये जसजसे फ्लोटिंग व्याजदर कमी हाेण्यास सुरुवात हाेईल, त्या वेळी अापल्या कर्जाचा मासिक किमान हप्ता वेगाने भरला जाईल. महागाई अाता नियंत्रणात अाल्याचे स्पष्ट िदसते अाणि रिझर्व्ह बँकेला मागणी अाणि गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर व्याजदर कपात टाळता येणे शक्य नाही.किरकाेळ महागाई एप्रिल महिन्यात कमी हाेऊन ती ४.८७ टक्क्यांवर अाली अाहे. घाऊक महागाईचा दर शून्यापेक्षा खाली २.६७ टक्के पातळीवर अाहेे.
या दाेन्ही महागाईचे कमी हाेणे हे व्याजदर कपातीच्या दृष्टीने याेग्य स्थिती अाहे. जर रघुराम राजन यांनी असेे केले नाही तर त्यांच्यामुळे अार्थिक विकासाचा वेग उगाचच मंदावेल. सध्या किरकाेळ महागाईशी तडजाेड केल्यानंतरही मुदत ठेवींवर ३ ते ४ टक्के जास्त व्याज मिळत अाहे, परंतु कर्जदारांना मात्र किरकाेळ महागाईच्या दरानुसार ५ ते ६ टक्क्यांपर्यंत जास्त व्याज द्यावे लागत अाहे.
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केल्यास कर्जदारांबराेबरच बँकांनाही एक प्रकारे मदत मिळते. व्याजदर कमी झाल्यानंतर बँकांनी खरेदी केलेल्या सरकारी राेख्यांच्या किमतीत वाढ हाेते. याचा अर्थ असा की व्याजदर कपात झाल्यानंतर बँकांना त्यांचा पुंजीगत लाभ हाेेणार. त्याचा उपयाेग बँका अापल्या पाेर्टफाेलिअाेमध्ये अडकलेले कर्ज राइट अाॅफ करण्यासाठी करू शकतात.
रिझर्व्ह बँक ही सरकारची बँकर अाणि कर्ज व्यवस्थापक अाहे. त्यामुळे महागाई कमी हाेत असताना रघुराम राजन यांना सरकारला उच्च व्याजदराने कर्ज घेण्याची परवानगी देणे अावडणार नाही. कारण यामुळे सरकारी तिजाेरीतील नुकसानीचे व्यवस्थापन करणे अाणखी कठीण हाेईल. व्याजदर कमी झाल्यास सरकारला कमी व्याजदराने
कर्ज घेता येईल अाणि कमी व्याजदराच्या परतफेडीतून सरकारी तिजाेरीतील ताेटा कमी करण्याच्या दृष्टीने मदत मिळू शकेल.
एकूण अाढावा घेता, व्याजदर कपात करण्यासाठी ही याेग्य वेळ अाहे. त्याचा केवळ कर्जदारांनाच लाभ मिळणार नाही तर उद्याेग, व्यावसायिक गुंतवणूक करण्यास प्रारंभ करतील. सरकारलाही सरकारी तिजाेरीतील ताेटा कमी करता येईल. कंपन्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध झाल्यामुळे महागाई अाणखी कमी हाेईल अाणि त्याचा फायदा कंपन्या ग्राहकांपर्यंत पाेहोचवतील. हाे, अाता व्याजदर घटल्यामुळे ठेवीदार काहीसे नाराज हाेऊ शकतात, पण महागाईशी तडजाेड केल्यानंतर प्रत्यक्ष परतावा समान राहू शकताे. अशा प्रकारे अापला देश एका अशा स्टेजवर गेला आहे, जिथे आर्थिक व्यवहाराची गती वाढण्यासाठी चांगले संकेत मिळत आहे. विशेषकरून पैसा जमा करण्याच्या उद्देशाने. त्यामुळे आता "अच्छे दिन'साठी सर्वांनी तयार राहा.
rjagannathan@dbcorp.in
लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.