आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडे विदेशी चलनाचा भरपूर साठा : जेटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ब्रेक्झिटचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जास्त होणार नसून त्यापासून निपटण्यासाठी सर्व तयारी असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. आपल्या देशाची सुरक्षा भिंत (फायरवाल) अत्यंत मजबूत असून असे झटके सहन करण्याची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. भारताकडे मुबलक प्रमाणात विदेशी चलन उपलब्ध असून जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. रिझर्व्ह बँक आणि इतर नियामक संस्थांंनी या समस्येपासून सुटका करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. सर्वांनी सोबत मिळून काम केले असल्यामुळे भारतावर त्याचा अलीकडच्या काळात जास्त परिणाम जाणवणार नाही. अर्थव्यवस्थेवर त्याचा जास्त परिणाम होणार नसल्याची काळजी आम्ही घेतली असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...