आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ने लॉन्च केले 13 नवीन प्लॅन्स; आता सर्वांना मिळणार जास्त 4G डाटा, असे आहेत प्लॅन्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - कित्येक महिने मोफत सेवा देऊन ग्राहकांना 4G इंटरनेटचे वेड लावणाऱ्या जियोने 13 नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. आतापर्यंत जियोच्या वेबसाईटवर केवळ 3 प्लॅन होते. त्यामध्ये नवीन प्लॅन जोडण्यात आले आहेत. यात जियो जुन्या किमतींमध्येच अधिकाधिक डाटा देणार आहे. अवघ्या 19 रुपयांपासून 4999 रुपयांपर्यंत हे प्लॅन आहेत. 
 
3 नवीन पोस्टपेड प्लॅन सुद्धा जाहीर
जियोने प्रिपेड प्लॅन जाहीर करतानाच नव्या 3 पोस्टपेड प्लॅन्सची सुद्धा घोषणा केली आहे. यात 309, 509 आणि 999 असे प्लॅन आहेत. हे प्लॅन 303 आणि 499 च्या प्लॅन्सची जागा घेणार आहेत. सर्वच प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये कॉलिंग, रोमिंग आणि मॅसेजिंग सेवा मोफत दिली जाणार आहे. 
 
नवीन प्लॅन्स केवळ प्राईम यूझर्ससाठी
यासोबतच, Jio ची धन धना धन ऑफर यापुढे केवळ जियो प्राइम यूझर्ससाठी उपलब्ध राहणार आहे. नॉन प्राइम यूझर्ज केवळ 19 रुपये ते 149 रुपयांचे प्लॅन घेऊ शकणार आहेत. इतर प्लॅन घेण्यासाठी त्यांना प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. धन धना धन ऑफर जाहीर करण्यापूर्वी तसे नव्हते. 
 
बातम्या आणखी आहेत...