आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय सांगता, विजय माल्यांनी थाटला तिसरा संसार? कोण आहे पिंकी ललवाणी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील बॅंकाचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये घेऊन रफूचक्कर झालेले मद्यसम्राट विजय माल्यांनी तिसरा विवाह केल्याची खमंग चर्चा सुरु झाली आहे. किंगफिशरची माजी कर्मचारी पिंकी ललवाणी हिच्यासोबत माल्यांनी तिसरा संसार थाटल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.

पिंकी ललवाणी ही माल्यांच्या खास लोकांपैकी एक आहे. ती मागील अनेक वर्षांपासून माल्यांसोबत आहे. उल्लेखनिय म्हणजे, माल्यांनी 2 मार्चला देश सोडला तेव्हा ती त्यांच्यासोबतच होती. जेट एअरवेजच्या विमानात माल्यांच्या शेजारच्या सीटवर बसल्याचे एका इंग्रजी वृत्त वाहिनीने म्हटले आहे.

कोण आहे पिंकी ललवाणी?
पिंकी ललवाणी ही किंगफिशर एअरलाइन्समध्ये 'एअर होस्टेस' म्हणून काम करत होती. तेव्हापासून (2011) ती माल्यांसोबत आहे. माल्यासोबत ती अनेक पार्टीजमध्येही सहभागी होते. माल्यांकडे येणार्‍या पाहुण्यांची देखरेख करते. मात्र, पिंकीला फार कमी लोक ओळखतात. किंगफिशरच्या जाहिरातीमध्येही ती दिसली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, कोण होती माल्यांची पहिली पत्नी...