आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या जागेत सुरु करा बॅंकेचे ATM ; महिन्याकाठी कमवा 15 ते 25 हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्याकडे 40 ते 100 वर्गफुट जागा असेल तर ती तुम्ही एखाद्या वित्त संस्थेला ATM साठी देऊ शकतात. या बदल्यात तुम्ही घरबसल्या 15 ते 25 हजार रुपये मिळवू शकतात. टाटा, मुथुट सारख्या खासगी कंपन्या संपूर्ण देशभरात 10 हजारांहून अधिक ATM सुरु करणार आहेत. आम्ही आपल्याला या कंपन्यांच्या स्‍कीमविषयी माहिती घेऊन आलो आहे.

'टाटा'च्या इंडिकॅशसाठी करा असा करावा अर्ज...
टाटा कम्‍युनिकेशन्सची सब्सिडरी कंपनी टाटा कम्‍युनिकेशन्स पेमेंट सोल्‍यूशन लिमिटेडच्या व्‍हाइट लेबल ATM ला भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) मान्यता मिळाली आहे. टाटाने इंडिकॅश नावाने आपली सर्व्हिस सुरुही केली आहे. ATM च्या जागेसाठी लोकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे.

या गोष्टी आवश्यक...
- तुमच्याकडे 60 ते 100 वर्गफुट जागा असावा.
- व्ही-सेट बसवण्यासाठी कॉंक्रीटचा स्लॅब असावा.
- याशिवाय व्ही-सेट बसवण्यासाठी अथॉरिटीची एनओसी, एक किलोवॅट विजेचे कनेक्शन, सायनेज स्‍पेस आवश्यक.
- लोकेशन व स्‍पेसचा फोटो देखील अर्जासोबत अपलोड करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्‍यासाठी पुढील URL वर क्लिक करा... http://www.indicash.co.in/rent-your-space

पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्या कंपन्या शोधत आहेत ATM साठी जागा?