आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • White, Silver And Black Most Popular Car Colors In The World

जगात पांढऱ्या रंगाच्‍या कारला सर्वाधिक पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांढऱ्या रंगाची कार - Divya Marathi
पांढऱ्या रंगाची कार
(जगात सर्वाधिक पसंत पडणाऱ्या कार)
नवी दिल्‍ली- जगात सर्वाधिक लोक पांढऱ्या रंगाची कार खरेदी करतात. यावर अमेरिकेतील कोटिंग मॅन्‍यूफॅक्‍चर कंपनी 'अक्‍साल्‍टा'ने ऑटोमोटीव्‍ह ट्रेडवर नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेत लोक सर्वाधिक पांढऱ्या रंगाच्‍या कारला पसंती दर्शवतात असे, आढळून आले आहे. ग्‍लोबल कार मार्केट 2014 मध्‍ये जेवढयाही कारची विक्री झाली, त्‍यापैकी सर्वाधिक 29 टक्‍के कार या पांढऱ्या रंगाच्‍या आहेत. यावरून असे लक्षात येते की, जगभरात लो‍क सर्वाधिक पांढऱ्या रंगाच्‍या कारलाच पसंती दर्शवतात.
पांढऱ्या रंगाची कार
पांढऱ्या रंगाच्‍या कारला जगभरात पसंती दर्शवली जाते. या कारला लोकप्रिय ठरवण्‍यात लोटस स्प्रिट एस-1 चा महत्त्वाचे योगदान आहे. या कंपनीने 1972 मध्‍ये पांढऱ्या रंगाची एक स्‍टायलिश कार लॉंन्‍च केली होती. या कारला प्रोडयुसर अलबर्ट आर ब्रो‍कोलीने जेम्‍स बॉंड सीरीजच्‍या 'द स्‍पाय हु' या चित्रपटात वापरले होते. तेव्‍हापासून पांढऱ्या रंगाच्‍या कारची लोकप्रियता सतत वाढत राहीली.
काळया रंगाची कार
जगात काळया रंगाच्‍या कारला पण खुप लोक पसंत करतात. या रंगाचा एक लोगो आहे तो म्‍हणजे विद्रोही, त्‍याग करणारा. सुरूवातीला जनरल मोटर्सच्‍या जीएनएक्‍स सीरीजची कार खुप प्रसिध्‍द झाली होती. ही कार काळया रंगाची होती. कंपनीने एका वर्षात केवळ 547 कारचीच निर्मिती केली होती, याचा प्रभाव खुप काळापर्यंत राहिला.
सिल्व्हर रंगाची कार
सिल्व्हर रंगाची कार सुरूवातीला जर्मन कारने बाजारात आणली, या कारचा इतिहास जर्मनी इतकाच जुना आहे. परंतु या कारला सगळयांपेक्षा मर्सिडीजने अधिक लोकप्रिय केले. मर्सिडीज बेंचने सिल्व्हर रंगाची 300 एसएल कुपे कार 1954 मध्‍ये बाजारात आणली होती.
गनमेटल-ग्रे रंगाची कार
गनमेटल-ग्रे रंगाची कारला पण खुप लोक पसंती देतात. या रंगाची कार 1964 मध्‍ये एस्‍टन मार्टिनने पहिल्‍यांदा बाजारात आणली. अशा रंगाच्‍या एक कारचा 2010 मध्‍ये लिलाव झाला तेव्‍हा या कारची बोली 46 लाख डॉलरपर्यंत गेली होती.
लाल रंगाची कार
लाल रंगाच्‍या कारला लोकप्रिय ठरवण्‍यात फेरारीचे मोठे योगदान आहे. फेरारीच्‍या अल्‍फा रोमिओ 8 सी या लाल रंगाच्‍या कारने खुप लोकांना प्रेमात पाडलं. 8 सी सीरीज कारची बेस्‍ट लुक कारमघ्‍ये गणना होते. ही कार 1960 मध्‍ये बाजारात आली होती.
कारचे छायाचित्र पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईड वर क्लिक करा