आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयओसी, एनटीपीसीत निर्गुंतवणुकीला मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) मधील १० टक्के, तर वीजनिर्मिती करणाऱ्या एनटीपीसीतील टक्के भागीदारी विकणार आहे. चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे लक्ष्य समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. आयओसी आणि एनटीपीसीचे शेअर विकून सरकारला १३,६०० कोटी रुपये मिळण्याची आशा आहे.
गेल्या १३ महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा सरकार आयओसीमधील समभाग विकण्यास तयार झाले आहे. सरकारला कंपनीमधील १० टक्के भागीदारी (२४.२७ कोटी शेअर) विकून जवळपास ८००० कोटी रुपये मिळू शकतात. त्याचप्रमाणे एनटीपीसीमधील टक्के भागीदारी (४१.२२) विकून जवळपास ५,६०० कोटी रुपये मिळू शकतात. एनटीपीसीमध्ये सरकारची भागीदारी ७४.९६ टक्के आहे. मात्र, कोणत्या पीएसयूमध्ये आधी निर्गुंतवणूक करायची, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रडारवरील आणखी कंपन्या : आयओसीमधील निर्गुंतवणुकीच्या निर्णयानंतर इंजिनिअर्स इंडिया लि. (आयएल), नाल्को आणि एनएमडीसीमधील १० टक्के भागीदारी विकली जाईल. याशिवाय नॅशनल फर्टिलायझर लि. (एनएफएल), हिंदुस्तान कॉपर लि. (एससीएल), इंडिया टुरिझम अँड डेव्हलपमेंट कॉ. (आयटीडीसी), स्टेट ट्रेडिंग कॉ.(एसटीसी) आणि एमएमटीसीमधील जवळपास १५ टक्के भागीदारी विकली जाईल.

युरियावरील सबसिडी कमी
केंद्रीयकॅबिनेटने नव्या युरिया धोरणाला मंजुरी दिल्यामुळे भारतातील उत्पादन २० लाख टन वाढवून सबसिडी ४,८०० कोटी रुपयांनी कमी करायची आहे. मात्र, युरियाच्या भावात वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी ५० किलो युरियाच्या बॅगची किरकोळ किंमत २६८ रुपये आहे. यात स्थानिक करांचा समावेश नाही. वर्षभरात जवळपास २.२ कोटी टन युरियाचे उत्पादन होते.
बातम्या आणखी आहेत...