आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून महिन्यात घाऊक महागाई दर 1.62 टक्क्यांवर पोहोचला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाज्या, डाळी आणि साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे जून महिन्यात घाऊक महागाई दर १.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा २० महिन्यांतील उच्चांक असून या आधी ऑक्टोबर २०१४ मध्ये १.६६ टक्के घाऊक महागाई नोंदवण्यात आली होती. याच वर्षी मे महिन्यात घाऊक महागाई दर ०.७९ टक्के तर गेल्या वर्षी जूनमध्ये उणे २.१३ टक्के होता. घाऊक महागाईत सलग पाचव्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने ऑगस्ट महिन्यात व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे. यात मे महिन्याच्या तुलनेत खाद्यान्नाचे दर जून महिन्यात ३७.६२ टक्क्यांनी वाढल्याने सर्वात जास्त चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

घाऊक महागाईचा १.६२ टक्के हा आकडा कमी वाटत असला तरी खाद्यपदार्थांच्या महागाईमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली असून ते ८.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. हा २३ महिन्यांचा उच्चांक आहे. या आधी जुले २०१४ मध्ये तो ८.४७ टक्के होता, तर मे २०१६ मध्ये ७.८८ टक्के होता.
गेल्या महिन्यात डाळी २६.६१ टक्के तर भाज्या १६.९१ टक्के महागल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत बटाटा ६४.४८ टक्के महाग झाला आहे, तर दुसरीकडे कांदा २८.६० टक्के स्वस्त झाला आहे. या आधी १२ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किरकोळ महागाई दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली होती. या वाढीसह खाद्यपदार्थांचा किरकोळ महागाई दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला होता.
बातम्या आणखी आहेत...