आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चमध्ये घाऊक महागाई वजा २.३३ टक्क्यांवर, खाद्य पदार्थ महागाई ६.३१ टक्क्यांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मार्चमध्ये घाऊक महागाई वजा २.३३ पर्यंत घसरली आहे. फेब्रुवारीत हा दर -२.०६ आणि मार्च २०१४ मध्ये ६ टक्के होता. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या महिन्यात महागाई दर शून्याखाली आहे. जानेवारीच्या आकडेवारीत दुरुस्ती करण्यात आली असून दर -०.३९ वरून -०.९५ टक्के करण्यात आला आहे. मार्चमध्ये किरकोळ महागाई ५.१७ टक्के होती.

मार्चमध्ये खाद्य पदार्थांचा महागाई दर ६.३१ टक्के राहिला. यातही सलग दुसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. जानेवारीमध्ये हा दर ८, तर फेब्रुवारीत ७.७४ टक्के होता. पेट्रोलच्या किमतीत १७.७ टक्के, डिझेलमध्ये १२.११ टक्के, एलपीजीमध्ये ७.९२ टक्के घसरणीसह इंधन व ऊर्जा क्षेत्रातील महागाई दर (-) १२.५६ टक्के राहिला.