आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whopping Rs. 4,000 Crores FDI Boost For Indian Pharma

केंद्राची अाैषध क्षेत्रात एफडीअायला परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टाेरँट फार्मास्युटिकल्स अाणि बायाेकाॅन रिसर्च सर्व्हिस यांच्यासह चार अाैषध अाणि वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या चार हजार काेटी रुपयांच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली अाहे. केंद्र सरकारने स्ट्राइड अर्काेलॅब या कंपनीच्या थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव नाकारला अाहे.

अहमदाबाद येथील टाेरँट फार्मास्युटिकल्सने थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या १३.०९ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला अाहे. हा प्रस्ताव तीन हजार काेटी रुपयांचा असून सरकारकडून मंजुरी मिळालेला मूल्य स्वरूपातील सर्वात माेठा एफडीअाय प्रस्ताव अाहे. विदेशी गुंतवणूक प्राेत्साहन मंडळाच्या २८ मे राेजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात अाली. सिनजेन इंटरनॅशनलनेदेखील विदेशी गुंतवणूक मर्यादा सध्याच्या १० टक्क्यांवरून ४४ टक्क्यांपर्यंत नेण्याच्या प्रस्तावालादेखील मंजुरी मिळाली अाहे. जवळपास ९३० काेटी रुपयांचा एफडीअाय प्रस्ताव असून ताे अाैषध क्षेत्रातील दुसरा सर्वात माेठा मान्यता मिळालेला प्रस्ताव अाहे.