आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदि गोदरेज यांना पत्नीशोक; परमेश्वर यांनी \'ब्रीच कँडी\'मध्ये घेतला अखेरचा श्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांची पत्नी परमेश्वर गोदरेज यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 70 वर्षांच्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून परमेश्वर यांच्यावर मुंंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आदि आणि परमेश्वर यांंना निशाबा, पिरोजशा आणि डबाश असे तीन अपत्ये आहेत.

AIDS विरोधात जनजागृती कॅम्पेन...
परमेश्वर गोदरेज या हीरोज प्रोजेक्टद्वारा देशात AIDS विरोधात जनजागृती कॅम्पेन चालवत होत्या. या इनीशिएटीव्हला त्यांना हॉलिवूड अॅक्टर रिचर्ड गेरे याच्यासोबत 2014 मध्ये लॉन्च केले होते.

परमेश्वर गोदरेज या एक इंडियन सोशलाइटसोबत फिलेन्थ्रफस्ट आणि फॅशन आयकॉन होत्या. अभिनेते अनुपम खेर, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान आदी दिग्गजांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कधीकाळी एअर होस्टेस होत्या परमेश्वर गोदरेज...फ्लाइटमध्ये झाली होती पहिली भेट...फॅशन डिझायनर...धर्मात्मा सिनेमात हेमा मालिनीचा कॉस्ट्यूम्स केला होता डिझाइन...
बातम्या आणखी आहेत...