आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या हाती कंपन्यांच्या प्रगतीची दोरी, जगभरा३.९% कंपन्यांत महिला सीईओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बहुतांश महिलांच्या हाती धुरा असलेल्या कंपन्या स्पर्धक कंपन्यांवर मात करण्याची शक्यता जास्त असते. इतकेच नव्हे तर संचालक मंडळात महिलांचा जास्त समावेश असलेल्या कंपन्या आपल्या भागधारकांना अधिक लाभांश देतात. क्रेडिस सुईस संस्थेच्या ‘वुमन इन बिझनेस’ अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कंपन्यांत महिला सीईओ नियुक्तीच्या बाबतीत भारत विकसित देशांच्या पुढे गेला आहे. भारतात ८.९ % सीईआेपदी महिला विराजमान आहेत. जगभरात हे प्रमाण ३.९ टक्केच अाहे. अमेरिकेत हा आकडा ३.५ टक्के आहे. क्रेडिट सुईसने जगभरातील ३ हजार कंपन्यांच्या सर्वाेच्च २८ हजार पदांच्या आकड्यांवरून हा अहवाल तयार केला आहे.

जगभरात महिला सीईओंची संख्या अल्प असल्याची चिंता अहवालात व्यक्त केली आहे. जबाबदारीची पदे देण्याबाबतीत महिलांशी भेदभाव केला जातो. त्यांच्या वाट्याला कमी प्रभावाची पदे जास्त येतात. उच्चस्तरीय व्यवस्थापनात महिलांची जगभरात भागीदारी १२.९ टक्के असली तरी सीईओ पदी मात्र ३.९ टक्केच महिला आहेत.
महिला आरक्षणाने चित्र बदलले
भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना भरीव आरक्षण दिल्यामुळे खेड्यापाड्यांतील लोकही त्यांच्या मुलींना उच्च शिक्षण घेऊ देत आहेत. मुलींच्या करिअरबाबत तेही सजग आहेत.

पोर्तुगाल अव्वलस्थानी
पोर्तुगाल33.3
बेल्जियम16.7
सिंगापूर15
नेदरलँड12.5
हाँगकाँग12.5
थायलंड12.5
इंडोनेशिया11.8
भारत8.9
ब्रिटन5.1
ऑस्ट्रेलिया4.5
अमेरिका3.5
चीन3.2
किमान एक स्त्री संचालक हवीच
भारतात नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळात किमान एक महिला संचालक असावी, हा नियम आहे. तसे नसल्यास सेबीने दंडाचीही तरतूद केली आहे. महिला संचालकांची नियुक्ती न केल्याने सेबीने जुलैत ५३० कंपन्यांना दंड केला होता.