आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटाबंदी : महिलांनी गिरवले अार्थिक साक्षरतेचे धडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारने एकाएकी चलनातून बाद केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांमुळे सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली. मुळात महिला या काटकसरी असल्या तरी या निर्णयामुळे त्यांच्या काटकसरीत आणखी वाढ झाली. केवळ महिलाच नाही, तर सारे कुटुंबच जमेल तेवढे पैसे वाचवून राेजचा खर्च करू लागले अाहेत. या नाेटाबंदीमुळे बचतीची सवय तर लागलीच, पण अनेक महिलांनी ई-बँकिंग, कार्डद्वारे पेमेंटसारख्या अत्याधुनिक बँकिंग सुविधांचा उपयोग करत पुन्हा नव्याने अार्थिक साक्षरतेचे धडे गिरवल्याचे अनेक महिलांनी सांगितले. त्यामुळे स्मार्टफाेन
वापरणाऱ्या महिला चलनकल्लाेळाने अाता खऱ्या अर्थाने स्मार्ट झाल्या.
नाेटाबंदीच्या िनर्णयानंतर एकीकडे नाेटा बदलण्याची कसरत, तर दुसऱ्या बाजूला कमी पैशात घर चालवण्याचे हे नवे आव्हान सगळ्यांनीच स्वीकारले. यामुळे एक मोठी गोष्ट घडून अाली, ती म्हणजे स्त्रियांना अार्थिक साक्षरतेचे महत्त्व यानिमित्ताने पटले. प्रत्येक सुविधेत ई-वाॅलेट, एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांसारख्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक बँकिंग सेवांची उपयुक्तताही यामुळे त्यांच्या लक्षात अाली.
विशेष म्हणजे प्रसंग अाला म्हणजे कमीत कमी रकमेत अापण घरखर्च कसा भागवू शकताे, याची एक प्राथमिक चाचणीदेखील झाली, काटकसर अाणि अर्थिक व्यवहारांची नवी अाेळख याबद्दल महिलांनी अापले वेगवेगळे अनुभव सांगितले.
अार्थिक साक्षरतेची नव्याने अाेळख : काटकसरीच्या मार्गाने भविष्यात वाटचाल करता येऊ शकेल, याची मुख्य जाणीव अाता सर्वांनाच झाली अाहे. विशेषकरून महिलांना अार्थिक साक्षरतेची पुन्हा नव्याने अाेळख झाली अाहे. पण केवळ एवढ्यावरच न थांबता अाता त्या अधिकाधिक माहिती घेऊन अापल्या कुटुंबाची अर्थव्यवस्था अधिकाधिक सुस्थितीत राहून अशा प्रसंगांवर मात करण्यासाठी अाधीच तयारी करण्याची मानसिकता तयार हाेऊन पर्यायाने कॅशलेस इकाॅनाॅमीचे महत्त्व बिंबवले जात अाहे. त्याचे फायदे सध्या अर्धसाक्षरांपर्यंत पोहोचले अाहेत; पण हळूहळू ग्रामीण भागाकडे पसरत जाणार असल्याचे मत गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अार्थिक समानता निर्माण झाली
- या निर्णयामुळे महिलांच्या अस्तित्वाची स्वतंत्र दखल घेतली गेलीय. नोटा बदलण्यासाठी खातेधारकालाच बँकेत उपस्थित राहावे लागते. त्यामुळे फक्त नावावर बँक खाते आणि वापर मात्र पती, भाऊ, मुलगा यांच्या माध्यमातून करणाऱ्या महिलाही आता बँकेत जाऊन आत्मविश्वासाने व्यवहार करू लागल्यात.
डॉ. शुभदा धारूरकर, अाैरंगाबाद
- सध्या गरज नसलेल्या वस्तू लिस्टमधून बाहेर काढल्या जात आहेत. बाहेर जेवायला जाणे किंवा फिरायला जाण्यालाही आळा बसला. गरजा कमी करताना मुलांच्या खर्चालासुद्धा ब्रेक लावला आहे. शिवाय मोठे व्यवहार हे डेबिट कार्ड किंवा चेकद्वारे करायला प्रत्यक्ष गांभीर्याने सुरुवात केली आहे.
प्रीती देशमुख, गृहिणी, अकोला
अार्थिक क्रांती
- महिलांकडे एटीएम कार्ड असले तरी त्याचा वापर कमी केला जायचा. पण अाता ताे हाेऊ लागला असून स्वत: व्यवहार करताना त्यांना वेगळा अानंद िमळत अाहे. महिलांच्या दृष्टीने ही िडजिटल क्रांती म्हटली पाहिजे.
मंजूषा गाडगीळ, जाहिरात व्यावसायिक
कार्डाचा वापर केला, अाॅनलाइन बँकिंगचे फायदे कळले
- राेखीचा खर्च कमी करून क्रेडिट कार्डाचा वापर केला. विशेष म्हणजे माझेही बँक खाते उघडले गेले. जग अाॅनलाइन हाेत असून त्याचे फायदे िशकणे ही काळाची गरज अाहे नाेटाबंदीमुळे अपडेट हाेता अाले. नाेटाबंदीमुळे सगळ्यांनाच पैशाची महती कळली.
अाशा पाटील, िशक्षिका, गजानन महाराज विद्यामंदिर, साेलापूर
गरजा ओळखल्या
- कमी पैशात, गरजा कमी करूनदेखील आनंदी जीवन जगता येते, ही शिकवण यातून मिळाली. या निर्णयामुळे जीवनातील गरजा कोणत्या आणि त्याचे महत्त्व ओळखता आले. निरर्थक होत असलेल्या खर्चाला आळा बसला.
डॉ. अंजली राजवाडे, प्राचार्या, गोयनका महिला महाविद्यालय, अकोला

- घरी काम करायला येणाऱ्या बायकांचे बँकेत खाते नसल्याने त्यांना सुरुवातीला त्रास झाला. पण त्यांना नोटा बदलून आणून दिल्यानंतर सुरळीत झाले. शिवाय त्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी साहाय्य केले. प्रत्येक महिलेचे बँकेत खाते असावे हे यातून शिकता आले. तसेच यातून एक प्रकारे आर्थिक समानता निर्माण झाली.
अश्विनी हातवळणे, माजी महापौर, अकोला.
- बँकिंग व्यवहारात महिलांना सवलत असल्याने अाता त्याही घर साेडून बाहेर पडू लागल्या अाहेत. माेबाइल बँकिंग म्हणजे काय हे समजावून घेत अाहोत.
राजेश्वरी बुंदेला, मुख्याध्यापिका, अॅस्ट्राेकिड्स शाळा, साेलापूर
- महिलांना सध्या होणारा हा त्रास क्षणिक आहे. पंतप्रधानांच्या जनधन योजनेमुळे जवळपास प्रत्येकीचे बँकेत खाते आहेच. त्यामुळे महिलांची कष्टाची बचत सुरक्षित आहे.
डॉ. प्रतिमा भाले, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...