आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय अर्थव्यवस्थेत 9 टक्के दराने वाढ होण्याची क्षमता- अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दावोस - चांगले वातावरण मिळाल्यावर भारतीय अर्थव्यवस्थेत नऊ टक्क्यांची वाढ होण्याची क्षमता असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. सध्या सात ते ७.५ टक्के विकासदर असून आमची क्षमता यापेक्षा कितीतरी जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. विकास दर वाढवण्यासाठी खासगी गुंतवणुकीवर आमचे विशेष लक्ष असल्याचेही जेटली यांनी सांगितले.
जगभरात आलेल्या आर्थिक मंदीमुळे आमची निर्यात कमी झाली असल्याचे जेटली यांनी सांगितले, तरीदेखील भारत जगातील सर्वात तेजीने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले. यापेक्षा चांगले करण्याची आवश्यकता असून अर्थव्यवस्थेत आणखी एक ते दीड टक्क्याने अधिक विकासदर साध्य करण्याची आमच्यात क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
जेटली यांनी मांडलेले मुद्दे
- जीएसटीसारखी अडकलेले बिले लवकरच मंजूर होतील.
- राज्यसभेत लवकर आम्हाला बहुमत मिळेल.
- अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मल्टिपल इंजिनची आवश्यकता.
- सरकारी गुंतवणुकीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय.
- देशातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर भर.