आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बाजारात २० टक्क्यांची घसरण, विक्री करण्याचा गुंतवणूकदारांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरातील बाजारात अार्थिक मंदी येण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी तेजीच्या घसरणीसह तयार राहण्याचा इशारा विदेशी बँक तथा संशोधन संस्था आरबीएसच्या वतीने देण्यात आला आहे. कच्च्या तेलाचे भाव आणखी कमी होऊन ते प्रति बॅरल १६ डॉलरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे बाजारात २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीसारखी स्थिती तयार होण्याची शक्यता दिसत असल्याचे मतही आरबीएसच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

चांगल्या स्थितीतील तसेच मोठे ब्रँड सोडले तर इतर सर्व शेअर विकण्याचा सल्लाही आरबीएसच्या वतीने गंंुतवणूकदारांना देण्यात आला आहे. सध्या चांगले रिटर्न येण्याची अपेक्षा करणे चुकीचे असून तुमची गुंतवणूक वाचवण्याचा विचार करावा, असा सल्लाही यामध्ये देण्यात आला आहे. चीनमध्ये या मंदीला सुरुवात झाली असून त्याचा परिणाम आता इतर बाजारांवरदेखील दिसत असल्याचे मत आरबीएसच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या वतीने व्याजदरात वाढ करून ही समस्या आणखी वाढवली असल्याचे मतही आरबीएसच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

युरोपीय परिणाम
जर्मनीमधील ब्रँड की यील्ड आता नीचांकी पातळी (ऑल टाइम लो) ०.१६ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपीय अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. युरोपीय अर्थव्यवस्थेचा परिणाम हा जगभरातील अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे मत
आरबीएसच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.

आधीही दिला इशारा
जागतिक बाजारात दिसत असलेल्या आर्थिक मंदीबाबत या बँकेने नोव्हेंबरमध्ये इशारा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याबाबत त्या वेळी आरबीएस बँकेच्या वतीने इशारा देण्यात आला होता. असे झाल्यास तुम्ही आगीशी खेळण्यासारखे होईल, असे मत या बँकेने नोव्हेंबरमध्ये व्यक्त केले हाेते.

कर्जात वाढ
जागतिक बाजाराची सध्याची स्थिती पाहिली तर व्यवसायात तेजीने घट होत असल्याचे दिसून येत असल्याचे मत आरबीएसचे क्रेडिट प्रमुख अॅड्रयू रॉबटर्स यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कंपन्यांवरील कर्जाचे ओझे आणखी वाढेल. यामुळे कंपन्यांची आकडेवारी आणखी खराब स्थितीत गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.