आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी ते ओबामा, जगातील या 25 दिग्गजांच्या जिद्दीला दुनिया करते सलाम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही तरी आगळेवेगळे करून दाखवण्याची जिद्द बाळगणारे हे चेहरे आहेत. आपली स्वप्ने, आपले विचार सिद्ध करून दाखवण्यासाठी ते जिद्दीने पेटले होते. त्यांची ही जिद्द त्यांच्या स्वत:च्या नफ्या-तोट्यासाठी नव्हती, तर जग बदलण्यासाठी होती. परिवर्तनाची जिद्द बाळगणाऱ्य देश-विदेशातील अशा २५ बड्या असामींचे विचार, त्यांचे शोध, प्रयत्न आणि शिकवण उलगडण्याचा हा एक प्रयत्न.

पैसा कमावायचा आहे अन‌् तोदेखील आपल्याच देशात

जिद्द होती की... आपल्यालोकांमध्येच राहून कोणाचेही नोकर होता पैसा कमावायचा. मध्यमवर्गाला त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांच्या बजेटमध्ये द्यायच्या.

जन्म- २८ डिसेंबर १९३२
निधन- ०६ जुलै २००२
प्रारंभ- २६ व्या वर्षी रिलायन्स कमर्शियलची स्थापना
उलाढाल- (३८ खर्व- मुकेश) (१० खर्व -अनिल, २०१२ मध्ये)
मार्केट कॅप - ३१ खर्व आणि १३० खर्व (२०१२ मध्ये)
निव्वळ नफा- प्रति समूह खर्वांपेक्षा अधिक (२०१२)
उपलब्धी- फिक्कीच्यामॅन ऑफ सेंच्युरी, एशिया वीक मॅग्झिनच्या आशियातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींत.


जेव्हा ते १७ वर्षांचे होते, त्या वेळी अदनमधील (येमेन) एका कंपनीत ३०० रुपयांच्या वेतनावर कारकून होते. यानंतर त्यांनी कित्येक अर्धवेल कामे केली. पेट्रोलपंपावर नोकरी करताना त्यांनी त्या पंपाचा मालक होण्याऐवजी मोठी रिफायनरी कंपनी उघडण्याचे स्वप्न पाहिले. त्यांना तीन गोष्टींची जाणीव झाली होती. पैसा कमावायचा आहे, आपल्याच देशात कमावायचा आहे पण नोकरी करून तो कमावणे शक्य नाही. धीरूभाई देशात परतले आणि मुंबईत लहानशा फ्लॅटमध्ये राहू लागले. त्यांनी १५ हजार रुपयांच्या भांडवलात रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन नावाची कंपनी उघडली अरब देशांमध्ये मसाला आणि फॅब्रिक्स निर्यात करू लागले. व्यवसायात भरभराट आली. पैसा कमवण्याची भूक आणखी वाढली. व्यावसायिकांमध्ये ओळख वाढली. यानंतर १९६६ मध्ये अहमदाबादपासून ३० किमी अंतरावर यंत्रे असलेली टेक्सटाइल मिल उभारली. भांडवल वाढताच धीरूभाईंचे स्वप्नही मोठे झाले. १९७८ मध्ये त्यांची कंपनी अहमदाबाद स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड झाली. अंबानी यांच्यासोबत ५८ हजार मध्यमवर्गीय परिवारांचे नशीबही जोडले गेले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, जिद्दीला पेटलेले जगातील 25 जिगरबाजांची यशोगाथा...