आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Achiever : Aditi\'s Start Up Company Turnover Is 2 Crore Rupees

नोकरी करावी, अशी आई-बाबांची इच्छा; मुलीने चक्क सुरु केली स्वत:ची कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढी मलहरा येथील राहाणारी आदिती चौरसियाने आई-वडिलांना सार्थ अभिमान वाटावा असेच कर्तृत्त्व केले आहे. आपल्या मुलीने नोकरी करावी, अशी आदितीच्या आई-वडीलांची इच्छा होती. मात्र, आदितीने एक पाऊल पुढे टाकत एकदा नव्हे तर दोनदा स्वत:ची कंपनी सुरु केली. आज आदितीच्या कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. नोकरी सोडून दोन वर्षे झाले तरी तिने अद्याप आपल्या आई-वडिलांपासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे.

वाचा, आदितीची संपूर्ण कहाणी...
आदिती चौरसियाने छतरपूरमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिला फॅशन डिझायनिंग करायचे होते. मात्र, त्याला तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. आदितीने सांगितले की, तिला मार्केटिंगमध्येही आवड होती. इंदूरमध्ये MBA केल्यानंतर आदितीने 'तितलिया' नामक स्वत:ची कंपनी सुरु केली. कस्टमाइज्ड हॅंडमेड कार्ड कंपनीचे उत्पादन होते. अल्पावधीतच आदितीच्या कंपनीला विदेशातून ऑर्डर मिळू लागल्या. मात्र, आई-वडिलांना तिला बिझनेस गुंडाळण्याचे आदेश दिले. तिने केवळ नोकरीकडे लक्ष द्यावे, अशी ताकीदही तिला दिली.

पुढील स्लाइडवर वाचा, आदीतीने पुन्हा सुरु केली 2 कोटींची कंपनी...