आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YouTubeचे हेडऑफिस, कर्मचारी कामासोबत करतात मौजमस्ती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
YouTube सुरु होऊन एक दशक उलटले आहे. YouTubeला 14 फेब्रूवारी 2005 ला प्रारंभ झाला होता. Youtubeवर पहिला व्हिडिओ 23 एप्रिल 2005 ला सकाळी 8 वाजून 27 मिनिटाला अपलोड झाला होता. 'Me at the zoo'असे या व्हिडिओचे नाव होते. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला Youtubeचे लक्झरियस ऑफिसविषयी माहिती देत आहोत. कर्मचारी आपल्या कामासोबत भरपूर मौजमस्तीही करताना दिसतात.
Youtubeचे ऑफीस कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथे आहे. ऑफिसच्या तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याकरीता तीन लोकांसाठी 'स्लीप अँड स्लाइड' बनवण्यात आले आहे. यावर बसताच कर्मचारी दुसऱ्या मजल्यावर पोहोचतात. एवढेच नव्हे तर कर्मचार्‍यांना आपले पाळीव प्राणी ऑफिसमध्ये आणण्यास मूभा आहे. Youtubeने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्विमिंग पूल बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे स्विमिंगपूल खूप मोठे आहेत. जगात आजपर्यंत कोणत्याही ऑफिसमध्ये असे मोठे स्विमिंगपूल बनवण्यात आलेले नाही.

Youtube विषयीचे UnKnown Information
- यांनी केली होती Youtube ची सुरुवात

Youtubeची सुरुवात चॅड मेरेडिथ हर्ले, स्टीव्ह चॅन आणि जावेद करिम यांनी केली होती. Youtubeचे हेडऑफिस युनायटेड स्टेट कॅलिफोर्नियाच्या सॅन ब्रुनो शहरात आहे.
- 'व्हॅलेंटाईन डे'ला बुक करण्यात आले होते डोमेन
'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी (14 फेब्रूवारी 2005) 'Youtube.com'हे डोमेन बुक करण्यात आले होते, आणि याच दिवशी वेबसाईट बनवण्याच्या कामाला सुरूवात झाली होती.
- Youtubeवर पहिला व्हिडिओ होता 'Me at zoo'
कंपनीचा फाऊंडर जावेद करीमने 23 एप्रिल 2005 ला Youtube वर पहिला व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ टेस्टींगसाठी अपलोड केला गेला होता आणि नोव्हेंबर 2005 मध्ये याला इतर युजर्ससाठी Live करण्यात आले होत.
- Googleने 2006 मध्ये Youtubeला घेतले विकत
Googleने 2006 मध्ये Youtubeला विकत घेतले. Googleने याला रिडिझाईन करून याचा मेकओव्हर केला. Youtube वर लाईव्ह चॅनलचे ऑप्शन गुगलनेच सुरू केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, YouTubeच्या ऑफिसचे PHOTOS,येथे कर्मचारी करतात मौजमस्ती....