आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जारा’चे ओर्तेगा जगातील श्रीमंत व्यक्ती; 2 दिवसांसाठी बिल गेट्स यांना टाकले मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- लोकप्रिय फॅशन ब्रँड ‘जारा’चे मालक अमांसियो ओर्तेगा केवळ दोन दिवसांसाठी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ‘फोर्ब्स’नुसार त्यांच्या कंपनीच्या समभागाचे भाव वाढल्याने बुधवार आणि गुरुवारी ओर्तेगा यांची एकूण संपत्ती मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांच्यापेक्षा जास्त होती.

“फोर्ब्स’ने त्यांची एकूण संपत्ती ७८ अब्ज डॉलर दाखवली असून गेटस यांची संपत्ती ७७.४ अब्ज डॉलर होती. परंतु शुक्रवारी शेअर्स पडल्यानंतर ओर्तेगा पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर घसरले. कंपनींच्या शेअर्स भावाच्या आधारावर “फोर्ब्स’ एकूण संपत्ती ठरवत असते. यात दररोज चढ-उतार होत राहतो. ओर्तेगा ऑक्टोबर २०१५ मध्ये पहिल्यांदा काही तासांसाठी जगातील श्रीमंत व्यक्ती बनले होते. ओर्तेगा यांचा जन्म १९३६ मध्ये स्पेन येथे झाला. त्यांचे वडिल रेल्वेमध्ये नोकरीला होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी गरिबीत दिवस काढले. एके दिवशी आईसोबत घरातील सामान आणण्यासाठी बाहेर गेले. परंतु दुकानदाराने उधारी देण्यास मनाई केली. हे ऐकून त्यांना खुप दु:ख झाले. त्याचवेळी त्यांनी शपथ घेतली की कुटुंबीयांना पैशाची कधीच कमी पडू देणार नाही. शिक्षण सोडून त्यांनी केवळ १४ वर्षांच्या वयात शर्ट बनवणाऱ्या कंपनीत डिलिव्हरी ब्वॉय म्हणून काम करण्यास सुरूवात केली. काही वर्षानंतर त्यांनी नाइट गाऊन आणि मुलांचे कपडे बनवण्याची कंपनी उघडली. त्यांनी पहिले “जारा’ शोरूम स्पेनमध्ये १९७५ मध्ये उघडले. त्याकाळात फॅशन लाँच झाल्यानंतर ती फॅशन दुकानापर्यंत येण्यास वेळ लागत असे. नवीन लाँचिंग पाहून त्या हिशोबाने ग्राहक मागणी करत होते. त्यामुळे ओर्तेगाने डिलेव्हरीच्या वेळेत घट करण्याचा निर्णय घेतला. आता फॅशन रॅम्पवरून ड्रेस स्टोरपर्यंत पोहचण्यासाठी केवळ दोन आठवडे लागतात.

व्यवस्थापकापेक्षा शॉप असिस्टंटला महत्त्व : कंपनीचेसीईओ पद त्यांनी पाच वर्षांपूर्वी सोडले. पण आतही ते सक्रीय आहेत. दररोज ऑफिसला जातात आणि दुकानदारांच्या प्रतिसादावर डिझाइन बनवण्याला प्राधान्य देतात. विशेष म्हणजे व्यवस्थापकापेक्षा शॉप असिस्टंटला ते जास्त महत्त्व देतात.

मुलाखत कधीही देत नाहीत
ओर्तेगा यांच्या बिझनेस ग्रुपचे नाव “इंडिटेक्स’ आहे. याचे ९१ देशांमध्ये हजाराहून अधिक स्टोर आहेत. “जारा’ हे याचाच एक ब्रँड आहे. जारा होम, मासिमो दुत्ती, बेर्सका, ओयशो, पुल अँड बिअर हे सुद्धा याचेच ब्रँड आहेत. ओर्तेगा प्रसारमाध्यमापासून नेहमी दूर राहतात. ते कधीही मुलाखत देत नाहीत. त्यांचे छायाचित्र घेण्याची संधीही कधी कधी मिळते. इंडिटेक्स या ग्रुप कंपनी २००१ मध्ये मेड्रिड स्टॉक मार्केटच्या यादीत आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमातही ते गेले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...