आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Transaction Detail To Give Income Tax Department From April 2016

आयकर विभागाचे नवे नियम, एप्रिलपासून मोठ्या व्‍यवहारांची माहिती द्यावीच लागेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्‍या एप्रिल महिन्‍यापासून आयकर विभाग नवीन नियम लागू करणार आहे. त्‍या आधारे रोख ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी, जंगम मालमत्तेची खरेदी-विक्री, मुदत ठेवी आणि परकीय चलन देवाणघेवाणी सारखे मोठे व्‍यवहार तुम्‍हाला किंवा तुमच्‍या वकिलांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवतील.
जाणून घ्‍या काय आहेत बदल, खात्‍यात 10 लाखांपेक्षा अधिक रक्‍कम जमा केली तर काय होईल...
1. पेमेंट: निश्चित रक्‍कमेपेक्षा जर तुम्‍ही अधिक पैसे बँक, कंपनी किंवा वकील-सीएसारख्‍या कोणत्‍याही प्रोफेशनलला देत असाल तर त्‍याची माहिती आयटी डिपार्टमेंटला देणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी नवीन फॉर्मेटचा फॉर्म 61 ए लागू करण्‍यात आला आहे.

2. इम्मूवेबल प्रॉपर्टी: 30 लाखांपेक्षा अधिक खरेदी-विक्रीची माहिती रजिस्ट्रार ऑफिसला द्यावी लागणार आहे.

3. प्रोफेशनल : कोणत्‍याही सेवेबद्दल (जसे वकील, सीए) यांना दोन लाखांपेक्षा अधिक रक्‍कम देणार असाल तर त्‍याची सूचना आयटी डिपार्टमेंटला देणे बंधनकारक राहणार आहे.

3. बँक- पोस्‍ट ऑफिसची एफडी : खात्‍यात वर्षभरामध्‍ये 10 लाखांपेक्षा अधिक रक्‍कम जमा होत असेल तर बँक त्‍याची माहिती आयटी डिपार्टमेंटला देईल. एफडीसाठीसुद्धा 10 लाखांचीच मर्यादा ठेवण्‍यात येणार आहे. एफडीच्‍या रिन्युअलवर हा नियम लागू असणार नाही.

4. क्रेडिट कार्ड : कार्डच्‍या माध्‍यमातून 1 लाख किंवा त्‍यापेक्षा अधिक बिल पेमेंट किंवा दुसऱ्या कुठल्‍याही माध्‍यमातून 10 लाखांपेक्षा अधिक पेमेंट जमा केले तर त्‍याची माहिती आयटी डिपार्टमेंटकडे पोहोचेल.
5. बँक ड्राफ्ट : वर्षभरात 10 लाख किंवा त्‍यापेक्षा अधिक रक्‍कमेचे ड्राफ्ट बनववले तर बँक त्‍याची माहिती सरकारला देईल.

6. करंट अकाउंट : एका वर्षात कुण्‍याही व्‍यक्‍तीच्‍या खात्‍यात 50 लाख रुपये किंवा त्‍यापेक्षा अधिक रक्‍कमेची ठेवी किंवा विड्रॉअलची माहिती बँक आयटी डिपार्टमेंटला देईल.

7. शेयर, फंड, बॉण्‍ड : कुणीही व्‍यक्‍ती कोणत्‍याही कंपनीचे शेअर, म्यूचुअल फंड, बॉण्ड किंवा डिबेंचरमध्‍ये एका वर्षात 10 लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक करत असेल तर त्‍याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागेल.