आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • More Investment More Employment This Way Formula

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जास्त गुंतवणूक-जास्त रोजगार या सूत्रानुसार तरतुदी असाव्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी गुंतवणूक होणे आवश्यक आहे. गुंतवणूक येण्यासाठी आकर्षक योजना आखाव्या लागतील. पायाभूत सुविधा, दिल्ली-मुंबई कॉरिडोर प्रकल्प आकारात आला तर मरगळ दूर होईल. अर्थमंत्र्यांना हे लक्षात घेऊन तरतुदी कराव्या लागतील. आगामी अर्थसंकल्पाविषयी सीआयआयचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष ऋषीकुमार बागला यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा ....
रोजगार निर्मितीवर भर देणारा अर्थसंकल्प असावा. खर्च आवरता ठेवून गुंतवणूकवाढीच्या योजना असाव्यात. दिल्ली-मुंबई कॉरिडोर प्रकल्पाला गती मिळावी


पायाभूत सुविधा
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पायाभूत सोयी-सुविधांचा विकास हे उत्तम साधन आहे. यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणा-या योजना अर्थसंकल्पातून अपेक्षित आहेत. रखडलेल्या पायाभूत प्रकल्पांसाठी पॅकेज द्यावे.
गुंतवणूक क्षेत्र
देशात गुंतवणूक वाढवण्यासाठी एखादी चांगली योजना यंदा अपेक्षित आहे. गुंतवणुकीला चालना मिळाली तर आपोआपच अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करेल. सकारात्मक दृष्टीने सर्वांनी गुंतवणुकीकडे पाहावे.
ऑटोमोबाइल क्षेत्र
अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ऑटो क्षेत्रात सध्या आर्थिक तंगीचे वातावरण आहे. चढ्या व्याजदरामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. व्याजदर कमी व्हावेत. निधीची, पैशांची उपलब्धता वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न अर्थसंकल्पातून अपेक्षित आहेत.
रोजगार निर्मिती
गुंतवणूक वाढीस लागली तर नवे उद्योग येतील. त्यामुळे त्यातून रोजगार निर्मिती होईल. अधिक गुंतवणूक-अधिक रोजगार हे समीकरण ध्यानात घेऊन सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतुदी कराव्यात. तूट भरून काढण्यासाठी ठोस उपाय करावेत.
कॅरिडोर प्रकल्प
औरंगाबाद, धुळे जिल्ह्यासाठी दिल्ली-मुंबई कॉरिडोर प्रकल्पाचे महत्त्व आहे. तो लवकरात लवकर आकारास येण्यासाठी सरकारने भरीव तरतूद करावी. यामुळे उत्पादन क्षेत्रातील मरगळ दूर होण्यास मदत होणार आहे.