आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Service Worker Want Extension In Income Limitation Assocham Survey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पगारदारांना सध्याच्या प्राप्तिकर मर्यादेत हवी वाढ - असोचेम सर्वेक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - आता सर्वांना वेध लागले आहेत ते केंद्रीय अर्थसंकल्पाचे. विशेष उत्सुकता आहे ती पगारदारांना. करबचतीच्या मर्यादेत किती वाढ होते याची. असोचेमतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बहुतेक पगारदारांनी सध्याच्या प्राप्तिकर मर्यादेत भरघोस वाढ करण्याची इच्छा व्यक्त केली. देशातील प्रमुख शहरांत बजेट 2013 : सर्वसामान्यांच्या अर्थमंत्र्यांकडून अपेक्षा या शीर्षकाअंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले.

देशातील नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, चंदीगड आणि डेहराडून येथे हे सर्वेक्षण घेण्यात आले. असोचेमच्या अहवालानुसार 89 टक्के पगारदारांनी सध्याचे प्राप्तिकर मर्यादेचे टप्पे महागाईशी निगडित नसल्याचे मत व्यक्त केले. प्राप्तिकराची मर्यादा सध्याच्या दोन लाख रुपयांवरून तीन लाख रुपयांपर्यत वाढवावी, महिलांसाठी ही मर्यादा 3.5 लाख रुपये करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे व्यक्तिगत क्रयशक्तीत वाढ होऊन खरेदीचा कल वाढेल असे बहुतेक पगारदारांना वाटते. घरापासून कार्यालयापर्यंत येण्यासाठी लागणारा 800 रुपयांपर्यंतचा खर्च सध्या करमुक्त आहे. ही मर्यादा दहा वर्षांपासून कायम आहे. त्यात बदल करून हा भत्ता प्रतिमहा 30,000 रुपये करावा असे अहवालात नमूद आहे.

आरोग्य विमा मर्यादा वाढवावी
उपचारांसाठीच्या खर्चात झालेल्या मोठ्या खर्चाचा विचार अर्थमंत्र्यांनी करावा, असे मत बहुतांश पगारदारांनी सर्व्हेच्या वेळी व्यक्त केले. सध्या आरोग्य विम्याअंतर्गत 15,000 रुपयांपर्यंत करसवलत मिळते. यात वाढ करून ही सवलत 50,000 रुपये करावी, असे पगारदारांना वाटते.