Home »Business »Budget 2013 »Script» SUV Sports Vehicle Launch Coming Soon

मदार एसयूव्हीवर... यंदा 8 ते 10 नव्या एसयूव्ही बाजारात येण्याच्या वाटेवर

बिझनेस ब्युरो | Feb 24, 2013, 00:31 AM IST

  • मदार एसयूव्हीवर... यंदा 8 ते 10 नव्या एसयूव्ही बाजारात येण्याच्या वाटेवर

नवी दिल्ली - भारतीय कार बाजार आता विकसित देशांप्रमाणे स्पोटर्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) कडे झुकतो आहे. यामुळेच 2012 मध्ये सर्वाधिक वाढीच्या क्षेत्रात एसयूव्हीचा समावेश होता. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल स्वस्त असल्याने ग्राहकांचा ओढाही डिझेल एसयूव्हीकडे आहे. यंदा 8 ते 10 नव्या एसयूव्ही बाजारात येण्याच्या वाटेवर आहेत. या वाढत्या श्रेणीतील ग्राहकांच्या कलाचा फायदा घेण्यासाठी कंपन्यांनी योजना आखल्या आहेत.
गेल्या वर्षात सर्वात जास्त पसंती मिळालेल्या एसयूव्ही श्रेणीत आपले उत्पादन उतरवण्यासाठी कंपन्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरूआहेत.
देशातील सर्वात मोठी पॅसेंजर कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकीने एक्स-ए अल्फा बाजारात आणण्याची तयारी केली आहे. 1.3 लिटर डिझेल इंजिन असणारी ही एसयूव्ही 2013 च्या दुसर्‍या तिमाहीत रस्त्यांवर धावताना दिसण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, निस्सान इंडिया डस्टरप्रमाणेच आणखी एक नवी एसयूव्ही बाजारात आणण्याची शक्यता आहे. निस्सान आणि रेनॉ संयुक्तपणे या एसयूव्हीची निर्मिती करणार आहेत. डस्टरच्या ग्राहकप्रियतेमुळेच निस्सानने या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे ठरवले. त्यानुसार निस्सान इंडियाची नवी एसयूव्ही 2013 च्या अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.
देशातील दुसर्‍या क्रमांकाची कार निर्माती कंपनी ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड आपली सेंटा फी ही एसयूव्ही नव्या अंदाजात सादर करण्याच्या तयारीत आहे.
याशिवाय फोर्डकडून 2013 मध्ये एसयूव्हीची प्रतीक्षा आहे.

फोर्ड ईकोस्पोर्ट या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला 2013 च्या पहिल्या सहामाहीत बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. देशाच्या युटिलिटी बाजारातील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा थार नव्या रूपात बाजारात आणू शकते. टाटा मोटर्सही त्यांच्या इंडिका व्हिस्टा प्लॅटफॉर्मचा वापर करून एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात आणण्याच्या विचारात आहे.
इटलीची फियाट कंपनी भारतात यंदा जीप ब्रँड अंतर्गत दोन एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने जीप रँग्लर आणि ग्रँड चैरोके या जीप कंप्लीट बिल्ट-अप युनिटसह (सीबीयू) भारतीय बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षीचा हॉट सेगमेंट
०भारतीय ग्राहकांचा एसयूव्हीकडे वाढता कल
०डिझेलवर चालणार्‍या प्रीमियम कारचे आकर्षण
०प्रीमियम सेडानऐवजी ग्राहकांचा एसयूव्हीकडे ओढा
०एसयूव्ही किंवा कॉम्पॅक्ट एसयूव्हीने सेडानचा हिस्सा हिसकावला
०यामुळेच गेल्या वर्षी प्रीमियम सेडान श्रेणीत फारशी वाढ नाही.

Next Article

Recommended